लोकलमध्ये जाण्याची मुंबईकरांना धास्ती, कोरोनाच्या भीतीनं लोकलमधील प्रवासी संख्या घटली

साम टीव्ही
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढलीय. त्याचा धसका लोकल प्रवाशांनी घेतलाय. गेल्या दहा दिवसांत लोकल प्रवाशांची संख्या जवळपास २ लाखांनी घटलीय.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढलीय. त्याचा धसका लोकल प्रवाशांनी घेतलाय. गेल्या दहा दिवसांत लोकल प्रवाशांची संख्या जवळपास २ लाखांनी घटलीय.

लोकलमध्ये जाण्याची मुंबईकरांना धास्ती, कोरोनाच्या भीतीनं लोकलमधील प्रवासी संख्या घटली

 मुंबईत कोरोनाच्या भीतीने  लोकलचा प्रवास हा नागरिकांना आता भीतीदायक वाटू लागला आहे.अनेक प्रवाशांनी लोकांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आठवड्याभराची आकडेवारी पाहता. मागील पाच दिवसात रेल्वे प्रवासी संख्येत दोन लाखांची घट झाल्याचे पाहायला मिळते, कोरोनाच्या या वाढत्या संख्येबाबत खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

एक फेब्रुवारीला मुंबईची लोकल सामान्यांसाठी सुरू झाली. पण त्या दिवसापासून मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्याही वाढली. कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्यानंतर लोकल प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीचा अभ्यास केला असता कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 2 लाख प्रवाशांची घट झालीय. 15 फेब्रुवारीला वेस्टर्न रेल्वेवर 17 लाख 59 हजार प्रवाशांनी प्रवास केला. हिच प्रवासीसंख्या घटून 19 नोव्हेंबरला 16 लाख 88 हजार इतकी कमी झाली. मध्य रेल्वेवर 15 फेब्रुवारीला 23 लाख 39 हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर 19 फेब्रुवारीला ही प्रवाशी संख्या २० लाखांपर्यंत खाली आली.  कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर प्रवाशांनी लोकलमधून प्रवास करणं टाळल्याचं दिसून येतंय.

लाखोंमधील प्रवासीसंख्या आणि हजार लोकल हे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. त्यामुळं कितीही नियम केले तरी लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. वाढती गर्दी आणि वाढता कोरोना पाहता प्रवाशांनीच काही दिवस लोकलमध्ये न चढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live