Coronavirus- चीनमध्ये बळींचा आकडा वाढला

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 मार्च 2020

आतापर्यंत मृतांची एकूण संख्या ४ हजारांवर पोचल्याचे सांगितले. जगभरात शंभराहून अधिक देशात १ लाख १० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

Coronavirus- बीजिंग- जगभरात कोरोनाचा हाहाकार पहायला मिळतोय.कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गेल्या चोवीस तासांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ४ हजार ११ वर पोचली आहे. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे वुहान शहराला भेट देत आहेत. कोरोना आजाराचा उद्रेक झाल्यानंतर शी जिनपिंग हे प्रथमच वुहानला येत आहेत. या वेळी ते वैद्यकीय अधिकारी, सैनिकी अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवक यांना भेटणार आहेत. याशिवाय रुग्ण आणि स्थानिक नागरिकांची पाहणी करणार असल्याचेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

एका दिवसात १७ रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, चीनच्या अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसने गेल्या चोवीस तासांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ४ हजारांवर पोचल्याचे सांगितले. जगभरात शंभराहून अधिक देशात १ लाख १० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारपर्यंत ८० हजारांहून अधिक नागरिकांना बाधा झाली होती तर आतापर्यंत ६० हजार नागरिकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले.

दक्षिण कोरियात १५० रुग्ण 
सोल- 
कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या दक्षिण कोरियात दीडशेहून अधिक नागरिकांना बाधा झाल्याचे उघडकीस आले असून दोन आठवड्यातील ही सर्वाधिक संख्या मानली जात आहे. सोमवारपर्यंत १३१ जणांना लागण झाल्याचे म्हटले आहे. एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५४ वर पोचली आहे. देशभरात आतापर्यंत ७, ५१३ जणांना बाधा झाली आहे. 

मंगोलियात पहिला रुग्ण 
उलनबाटर : जगातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता मंगोलियात खबरदारी घेतली जात आहे. मात्र कोरोनाबाधित एक रुग्ण आढळून आला असून तो रशियाहून आलेला आहे. तो फ्रान्सच्या ऊर्जा कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे. 

किती नुकसान झालं ?
वॉशिंग्टन : कोरोनामुळे यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला सुमारे २ हजार अब्ज डॉलर नुकसान होण्याची शक्यता व्यापार आणि विकाससंस्थेने व्यक्त केली आहे. या आजारामुळे काही देशात मंदी येऊ शकते आणि जागतिक विकास दर कमी होऊन अडीच टक्के राहू शकतो, असे भाकितही केले गेले आहे.

WEB TITLE- The number of victims has increased in China

 


संबंधित बातम्या

Saam TV Live