राष्ट्रीय पोषण अभियानमध्ये महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

 राष्ट्रीय पोषण अभियानमध्ये महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

नवी दिल्ली - देशाला 2022 पर्यंत संपूर्ण कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून, उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. कुपोषणमुक्ती व पोषण आहाराच्या क्षेत्रात सर्वांत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल छत्तीसगड राज्यातील मानसा जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून, महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै 2018 पासून राज्यात सुरू असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीच्या आधारे क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी या क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोषण आहार अभियानाच्या अंमलबजावणीत 2015 अंगणवाड्यांत तीन लाख उपक्रम राबविणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि एएनएम कार्यकर्त्या यांच्या उत्तम समन्वयातून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नगर जिल्ह्यातील नेवासे आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक-2 (शहर) या दोन प्रकल्पांचाही सन्मान करण्यात आला. दोन लाख 50 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर गट राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलावडे यांनी पुरस्कार स्वीकारला.


Web Title: Nutrition Campaign Award Maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com