गांधी जयंतीनिमित्त विशेष ट्रेन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेत सीएसएमटी ते ठाणे आणि वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहे. गांधीजींनी संपूर्ण जगाला अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश दिला. हाच संदेश मुंबईकरांना देण्यासाठी एक विशेष ट्रेन मध्य रेल्वेवर चालविण्यात येणार आहे. 

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती संपूर्ण देशात उत्साहात साजरी होत आहे. या जयंतीनिमित्ताने रेल्वेने 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान 15 दिवसांचा स्वच्छता पंधरवडा देखील साजरा केलेला आहे. त्यामध्ये स्थानके स्वच्छ करण्यासोबतच स्वच्छ पाणी, स्वच्छ भोजन आणि नो प्लॅस्टिक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंअंतर्गत 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छतेबाबत संदेश देणारी लोकल चालविण्यात येणार आहे.

सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरुन ठाण्याकरिता स्पेशल ट्रेन सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून, दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी ठाण्याला पोहोचणार आहे. ही ट्रेन सीएसएमटी ते भायखळा दरम्यान जलद डाउन मार्गावरुन आणि भायखळा ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावरुन चालणार आहे. तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वाशी स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म 1 वरुन सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी निघून दुपारी 12 वाजून 9 मिनिटांना वाशीला पोहोचणार आहे. या ट्रेनने प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. या ट्रेनवर वेगवेगळे संदेशही नमूद करण्यात आलेले आहेत.

Web Title: On the occasion of Mahatma Gandhi Birth Anniversary Special Train will be run on Central Railway Route

संबंधित बातम्या

Saam TV Live