नांदेड हिंसाचार प्रकरणात ४००लोकांवर गुन्हा दाखल

साम ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

सोमवारी होला-मोहल्ला मिरवणुकीत पोलिसांवर (Police) हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये 400 हून अधिक जणांविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आली आहे​

नांदेड : सोमवारी होला-मोहल्ला मिरवणुकीत पोलिसांवर (Police) हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये 400 हून अधिक जणांविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात 4 पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. Offence Registered against Four Hundred Person for Nanded Violence

नांदेड (Nanded) येथे परवानगीशिवाय होला-मोहल्ला मिरवणूक थांबविण्यासाठी गेले असता पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि लाठ्यांनी हल्ला करण्यात आला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या मिरवणुकीस परवानगी नव्हती. हे रोखण्यासाठी गेलेल्या एसपी (SP) आणि डीएसपीच्या(DSP) वाहनांवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यादरम्यान शीख महिला दगडफेक देखील करताना दिसल्या आहेत. अचानक गर्दीने गुरुद्वाराबाहेर येऊन बॅरिकेड तोडून पोलिसांवर हल्ला केला. या काळात झालेल्या हिंसाचारात अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live