अजित पवारांच्या सभेच्या संयोजकांवर गुन्हा दाखल

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

अजित पवार यांच्या काल झालेल्या सभेत कोरोना काळात लावलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी सभा संजोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलिसात कलम 188 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पंढरपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काल पंढरपुरात (Pandharpur) सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. आणि या सभेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रचंड प्रमाणात लोकांनी गर्दी जमवली होती. या प्रकरणामुळे सभेचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. Offence Registered Against Organizer of NCP Leader Ajij Pawar Pandharput Rally

पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur Mangalwedha) विधानसभा पोटनिवडणुकी (Bi- election) रणधुमाळीत आता कोणाचा विजय होते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव  मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी घेतलेले  भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल (ता.8 एप्रिल) ला अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रमाला फक्त 200 लोकांची परवानगी होती. मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग लांब लांब पर्यंत दिसून येत नव्हते. यातील अनेक जण तर मास्क न घालताच सभेला आले असल्याचे दिसत होते. यावेळी कोरोना निर्बंधांना धुळीस मिळवण्यात आले. Offence Registered Against Organizer of NCP Leader Ajij Pawar Pandharput Rally

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांचा हा मेळावा आयोजित केला होता. यामुळे त्यांच्यावर कोरोना काळात लावलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पंढरपूर शहर पोलिसात कलम 188 (Section 188) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live