हजारोंचा गर्दीत मुलीचे लग्न करणे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला भोवले

Offence registered agianst Kalyan Shivsena Corporator for Flouting Corona Rules
Offence registered agianst Kalyan Shivsena Corporator for Flouting Corona Rules

कल्याण : कोरोनाचे (Corona) नियम धुडकावत मुलीचा विवाह सोहोळा हजारोंच्या गर्दीत पार पाडण्याचा उत्साह येथील शिवसेना नगरसेवक सुनील वायले यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. Kalyan Police Registred offence Against Shivsena ex Corporator

कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील काळा तलाव नजीक असलेल्या भवानी मॅरेज लॉन मध्ये आज शिवसेनेच्याच (Shivsena) माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीच लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता.या लग्नसोहळ्याला हजारो नागरिकांची गर्दी होती.कोरोनाचे कोणतेही नियम इथे पाळण्यात आले नव्हते.Offence registered agianst Kalyan Shivsena Corporator for Flouting Corona Rules

याच लग्न सोहळ्याची बातमी प्रसिद्ध होताच कल्याण मधील पोलीस (Police) जागे झाले आणि त्यांनी भवानी मॅरेज हॉलचे व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग (Ramesh Laxman Singh), वधुपिता सुनिल राजाराम वायले आणि सुरेश गंगाराम म्हात्रे यांच्यावर कलम १४४(१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

एरवी मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर महापालिका कारवाई करते, आणि 500 रुपये दंड लावते.या लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्यानी सुद्धा मास्क घातला नव्हता. आता त्यांच्यावर सुद्धा महापालिका कारवाई करत प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करणार का हे पाहावे लागेल. Offence registered agianst Kalyan Shivsena Corporator for Flouting Corona Rules

कोरोना वाढत असला तरीही एकीकडे असले तरी कल्याण  मध्ये मात्र आज ही बिनदिक्कत राजकीय पदाधिकाऱ्यांचे सोहळे आयोजित होताना दिसत आहेत.  सोशल डिस्टन्सिंग (Socail Distancing) सोडा मात्र साधा मास्क (Face Mask) घालण्याची तसदी देखील  बहुतेक नागरिकांनी घेतलेली दिसून आलेली नाही .शहरात कोरोनाचे रुग्ण संख्या मध्ये पुन्हा एकदा वाढ होत असताना लोकप्रतिनिधींना मात्र सामाजिक भान नसल्याचे दिसून येते आहे. 

Edited By - Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com