ऑफिसेस सुरु तर केलीत, मात्र ऑफिसला जायचं कसं?

साम टीव्ही
गुरुवार, 11 जून 2020
  • कार्यालयं सुरू; पण कार्यालयात पोहोचणार तरी कसं ? 
  • बससाठी ३-४ तास रांगेत उभं राहण्याची मजबुरी 
  • महिला नोकरदारांचे हालच हाल... 

लॉकडाऊनचे नियम शिथील करून सरकारनं खासगी कार्यालय सुरू करायला परवानगी दिली खरी, पण त्यामुळे नोकरीसाठी दररोज मुंबईत अपडाऊन करणाऱ्या महिला नोकरदारांसमोर वेगळाच प्रश्न निर्माण झालाय.  

... हे चित्र आहे डोंबिवलीतलं... हीच अवस्था, कल्याण आणि दिवा इथेही पाहायला मिळतेय... लॉकडाऊनचे नियम शिथील करून राज्य सरकारनं खासगी कार्यालयं सुरू करायला परवानगी दिली. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची पुरेशी सुविधा नसल्यानं बससाठी अशा रांगा लावाव्या लागतायत. सकाळी १० वाजताच्या बसमधून प्रवास करता यावा, यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावाव्या लागतायत. घरचं सगळं काम उरकून येणाऱ्या महिलांना याचा सर्वात जास्त त्रास होतोय. 

पुरुषांच्या बरोबरीने महिलाही नोकरी करतात, त्यांची संख्या लक्षात घेता, महिलांसाठी खास बस आणि लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आता केली जातेय. तीन चार तास रांगेत तिष्ठत उभं राहण्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जातेय. 

नोकरीसाठी मुंबईत दररोज अपडाऊन करणाऱ्या महिलांचे हे हाल लक्षात घेता, सरकारनं लवकरात लवकर सार्वजनिक वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी मागणीही आता जोर धरू लागलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live