अरेच्चा! 2 फुटांची उंची, लग्नासाठी गोची! आणि पठ्ठ्या डायरेक्ट पोलिसांकडे..

साम टीव्ही
रविवार, 14 मार्च 2021

दोन फुटांची उंची आली लग्नाच्या आड
वैतागलेल्या युवकानं गाठलं पोलिस ठाणं
लग्न करून देण्याची घातली पोलिसांना गळ

 

 

s="r<iframe width=">tejustify

 

लग्न जमत नाही म्हणून निराश झालेल्या एका तरूणाने चक्क पोलिस ठाणं गाठलंय. पोलिसांनी तरी आपलं लग्न जुळवण्यास मदत करावी असं साकडंच त्याने पोलिसांना घातलंय. पाहूयात हा प्रकार नेमका कुठे घ़डलाय. 

लग्न जमत नसल्यानं एका व्यक्तीने थेट पोलिस ठाणं गाठलं.आणि चक्क पोलिसांनाच आपलं लग्न लावून देण्याची गळ घातली. हा प्रकार घडलाय उत्तर प्रदेशातल्या शामली जिल्ह्यात.शामलीच्या जनपद परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अझीम हा 26 वर्षीय युवक सध्या प्रचंड निराश झालाय. मोहम्मदची उंची अवघी 2 फुट असल्याने त्याला लग्नासाठी नवरी मिळत नाहीये. गेल्या काही वर्षांपासून त्याला त्याच्या लग्नाची चिंता सतावतेय. 

मोहम्मदची ही अनोखी समस्या ऐकून पोलिसही चक्रावून गेलेत. मोहम्मदसाठी दोन फुटांची नवरी कुठून शोधायची असा प्रश्न पोलिसांना पडलाय. त्यामुळे तूर्तास तरी त्याला पोलीस स्टेशनमधूनही मोकळ्या हातानेच परतावं लागलंय. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live