VIDEO | राष्ट्रवादीच्या आमदारांची मदत्वाची बैठक, शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मुंबई :  राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची लवकरच नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरणार असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला असला तरीही नवीन स्थापन सरकार झालेले नाही. तेराव्या विधानसभेचा कालावधी शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपला असून, देवेंद्र फडणवीस हे प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहत आहेत. अशा राजकीय अस्थिरतेत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला ते निमंत्रण देणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात असताना येत्या मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या 54 आमदारांना मुंबईत बैठकीला बोलावले आहे. 
राज्यातील घडामोडी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने आपल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

सत्ता स्थापन होताना भाजप घोडेबाजार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, म्हणून ही खबरदारी घेतली आहे. कॉंग्रेसने आपले आमदार जयपूरला पाठवले आहेत, तर शिवसेनेने मुंबईतच सुरक्षित ठिकाणी रवाना केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

आता शरद पवार हे पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीत राज्यातील घडामोडींबाबत ते चर्चा करणार असून, संभाव्य सत्ता स्थापनेबाबत सोनिया यांच्याशी सल्लामसलत करतील, असे सांगण्यात येते.

WebTitle : once again sharad pawar to meet sonia gandhi this might be reason

संबंधित बातम्या

Saam TV Live