म्युकोरमायकोसिसच्या आजरामुळे डोंबिवलीत एकाचा मृत्यू , तर ग्रामीण भागात एकाचा मृत्यू

प्रदीप भणगे
मंगळवार, 11 मे 2021

कोरोनाइतकेच मोठे संकट ठरण्याची शक्यता असलेल्या म्युकोरमायकोसिस या आजाराने आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केला आहे. म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला आहे.याची माहिती केडीएमसी अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांनी आज दिली.

डोंबिवली - कोरोनाइतकेच मोठे संकट ठरण्याची शक्यता असलेल्या म्युकोरमायकोसिस mucormycosis या आजाराने आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केला आहे. म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील Dombivli वृद्धाचा मृत्यू  Death झाला आहे. तर ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला आहे.याची माहिती केडीएमसी अधिकारी डॉ.अश्विनी पाटील Ashiwini Patil यांनी आज दिली. One dies in Dombivli due to mucormycosis

डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात Hospital म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण होताना दिसत होती. मात्र, आता हा रोग शहरी भागांमध्येही हातपाय पसरायला लागला आहे. नुकतीच ठाण्यातही एका महिलेला या रोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. म्युकोरमायकोसिसचा हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. One dies in Dombivli due to mucormycosis

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन Infection आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत.

चौकशीसाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला

या आजाराचे सायन्स मधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता असते. म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live