परमबीरसिंग यांच्या अडचणीत वाढ...आणखी एका प्रकरणात चौकशीचे आदेश

सूरज सावंत
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambirsingh यांची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. पोलिस अधिकारी Police अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार व अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambirsingh यांची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. पोलिस अधिकारी Police अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार व अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची चौकशी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande करणार आहेत. One more inquiry against Mumbai Ex CP initiated by Maharashtra Government

पोलिस अधिकरी अनुप डांगे यांनी पोलिस महानिरीक्षक परमबीरसिंग यांच्यावर भ्रष्टाचार आणि अंडरवल्डशी Underworld  संबध असल्याचे आरोप केले होते. अनुप डांगे हे गावदेवी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या तक्रारीत  परमबीर यांनी कशा प्रकारे पदाचा गैरवापर केला. त्यांचे अंडरवल्डशी कसे संबध आहेत, हे सांगणारे पत्र मुख्यमंञ्या्ना दिले आहे. 

या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते आणि ही चौकशी सध्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh हे १०० कोटी वसूली करण्यास सांगत असल्याचा आरोप करत मुख्यमंञ्यांना पञ लिहिले होते. One more inquiry against Mumbai Ex CP initiated by Maharashtra Government

 या प्रकरणी परमबीरसिंग यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. न्यायालयने सीबीआयकडे हे प्रकरण चौकशीलाठा सोपवले. या प्रकरणात परमबीर सिंह, सचिन वाजे Sachin Waze, अनिल देशमुख, त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, पोलिस दलातील एक डीसीपी, आणि एसीपीसह अन्य काही जणांचे जबाब ही नोंदवण्यात आले आहेत. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live