अँटिलिया स्फोटक प्रकरणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक

सूरज सावंत
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एनआयए NIAने पोलिस अधिकारी सुनिल मानेला अटक केली आहे. सुनिल माने मनसुख आणि सचिन वाजे यांच्यात ३ फेब्रुवारीला मिटिंग झाल्याचं सांगितलं जात आहे. 

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात Antilia Bomb Case एनआयए NIAने पोलिस अधिकारी सुनिल मानेला अटक केली आहे. सुनिल माने, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे Sachin Waze यांच्यात ३ फेब्रुवारीला मिटिंग झाल्याचं सांगितलं जात आहे. 

माने यांनी या प्रकरणात मनसुख हिरेनवर Mansukh Hiren गुन्हा कबूल करण्यासाठीही दबाव टाकल्याची माहिती आहे.सुनिल माने हे सध्या सशस्ञ पोलिस दलात Mumbai Police कार्यरत होते. माञ माने हा  गुन्हे शाखेत प्रभारी म्हणून कार्यरत असताना, त्या काळात वारंवार वाझे यांना भेटायलाही यायचा, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी Explosives भरलेल्या कारमधील जिलेटीन आरोपींना उपलब्ध केल्याप्रकरणी ठाण्यातील एक व्यावसायिक राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) रडावर आला आहे. One more police Officer arrested in Antilia Bomb Case

जिलेटिन कांड्यांचा संबध व्यावसायिक महत्त्वाकांशी प्रकल्पाशी संबंधीत असल्याची सूञांची माहिती आहे. हा व्यवसायिक यापूर्वी याप्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या संशयितांच्या परिचयाचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.या व्यवसायिकाचे अनेक प्रतिष्ठीत व्यक्तीसोबत मैत्रीपूर्ण संबंध असून त्यात अनेक आजी-माजी पोलिस अधिका-यांचाही समावेश आहे. 

आता लवकरच एनआयए NIA या व्यावसायिकाला चौकशीला बोलवले जाण्यायी शक्यता आहे. अँटिलिया बाहेर ठेवलेल्या स्कॉर्पिओमधून जप्त केलेल्या जिलेटीन काड्यांवर नागपूर Nagpur येथील एका कंपनीचे नाव होते.

कंपनीतून दोनशे जिलेटीनचा बॉक्स देण्यात येतो. बॉक्सवर असलेल्या क्युआर कोडवरून तो माल कुणाला दिला, याची माहिती मिळते. मात्र, या अवघ्या २० जिलेटीन कांड्या असल्यामुळे त्याची माहिती मिळणे अवघड आहे. आतापर्यंत ज्यांना जिलेटीनच्या काड्या पुरविण्यात आल्या त्यांच्याकडून या जिलेटीनच्या कांड्या गेल्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  One more police Officer arrested in Antilia Bomb Case

या जिलेटीनच्या कांड्यांचे वजन अडीच किलो होते. सुरूवातीला स्फोटके दाखवून संशयीतांचा एन्काउटर प्रकरण्याचा कट होता. प्रत्यक्षात दुस-या स्फोटकांऐवजी जिलेटीन ठेवण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live