चिंता वाढली! आता 'या' राज्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला

अशोक सुरवसे
बुधवार, 18 मार्च 2020

ज्या राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत, त्या राज्यात सर्वाधिक वेगवान कोरोना पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो आहे. मुंबई, दिल्ली, केरळमध्ये परदेशातून येणाऱ्यांच्या संख्या मोठी असल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा तर्क लावला जातो आहे.

मुंबई - देशात सध्या कोरोनाचं थैमान पाहायला मिळत आहे. सगळ्यांनीच कोरोनाची प्रचंड धास्ती घेतली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यात चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येते आहे. कोरोनाचा रुग्ण आता देशातील आणखी एका राज्यात आढळून आलाय. 

 

देशातील 15 राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा नव्यानं रुग्ण आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यातच देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोज वेगान वाढत असल्यानं कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान सध्या सगळ्यांसमोर उभं ठाकलंय. 

 

कोरोनाचे कोणत्या राज्यात किती रुग्ण?

 • महाराष्ट्र - 42
 • केरळ - 27
 • उत्तर प्रदेश - 16
 • हरियाणा - 16
 • कर्नाटक - 11
 • दिल्ली - 10
 • लडाख - 8
 • राजस्थान - 4
 • जम्मू काश्मीर - 3
 • तेलंगणा - 3
 • पंजाब - 1
 • उत्तराखंड - 1
 • तामिळनाडू - 1
 • आंध्र - 1
 • ओडिशा - 1
 • पश्चिम बंगाल - 1

 

 

ज्या राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत, त्या राज्यात सर्वाधिक वेगवान कोरोना पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो आहे. मुंबई, दिल्ली, केरळमध्ये परदेशातून येणाऱ्यांच्या संख्या मोठी असल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा तर्क लावला जातो आहे. दरम्यान आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे. गर्दी रोखण्यासोबतच सर्वप्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

 

 

जनावाला कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक राज्यांमध्ये झाला आहे. आतापर्यंत 140 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या कोरोना व्हायरसं लोण आता भारतीय सेनेपर्यंतदेखील पोहोचलंय. लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याच्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. या जवानाचे वडील काही दिवसांपूर्वीच इराणवरुन भारतात परतल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून या जवानाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आतापर्यंत देशात 147 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.  कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.  

 

हेही वाचा - कोरोनाला घाबरु नका, अशी घ्या काळजी!

हेही वाचा - उन्हामध्ये कोरोना टिकत नाही?

हेही वाचा - कोरोना भारतात कुठून असा आला...

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

MUMBAI MAHARASHTRA INDIA CORONA VIRUS COVID 19 INTERNATIONAL HEALTH DELHI STATES ARMY JAWAN


संबंधित बातम्या

Saam TV Live