करोनाचे एक तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 11 मे 2020

महाराष्ट्रानंतर गुजरात (४७२) व मध्य प्रदेश (२१५) यांचा क्रमांक लागत आहे. ओडिसा, चंडिगड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही राज्ये सुरक्षित असून तेथे प्रत्येकी केवळ दोन करोनामृत्यू झाले आहेत. मेघालय व उत्तराखंडमध्ये तर प्रत्येकी एकेक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी १२८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक म्हणजे ४८ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर गुजरात (२३), मध्य प्रदेश (१५), प. बंगाल (११) असे प्रमाण आहे.

देभरातील करोनाबाधितांची संख्या ६२,९३९वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी १२८ रुग्णांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.  देशभरातील एकूण नोंदीत महाराष्ट्रातील आकडेवारी ही अद्यापही चिंताजनक असल्याचे दिसत आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेले रुग्ण व करोनाबाधित रुग्ण यांचे सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रात दिसून येत आहे.करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या विषाणूची लागण झाल्याने देशभरात रविवारपर्यंत २,१०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

करोनाबाधितांमध्ये १११ विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर संबंधित रुग्णांवर उपचार होणे व त्यातून ते बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ३०.७५ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत रविवारी ३,२७७ची भर पडली. यामुळे आतापर्यंत या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६२,९३९वर पोहोचली. मात्र यातील १९,३५७ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४१,४७२ नोंदविण्यात आली आहे. 
महाराष्ट्राची आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्रानंतर गुजरात (४७२) व मध्य प्रदेश (२१५) यांचा क्रमांक लागत आहे. ओडिसा, चंडिगड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही राज्ये सुरक्षित असून तेथे प्रत्येकी केवळ दोन करोनामृत्यू झाले आहेत. मेघालय व उत्तराखंडमध्ये तर प्रत्येकी एकेक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी १२८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक म्हणजे ४८ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर गुजरात (२३), मध्य प्रदेश (१५), प. बंगाल (११) असे प्रमाण आहे. उत्तर प्रदेशमध्ये रविवारी ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर राजस्थान व दिल्लीमध्ये प्रत्येकी ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. देशभरात आतापर्यंत एकूण २,१०९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील ७७९ जणांचा समावेश आहे.

करोनाबाधितांची संख्याही महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. महाराष्ट्र (२०,२२८), गुजरात (७,७९६), दिल्ली (६,५४२), तमिळनाडू (६,५४५), राजस्थान (३,७०८), मध्य प्रदेश (३,६१४), उत्तर प्रदेश (३,३७३) अशी रुग्णसंख्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

लॉकडाउनमुळे होणारे आर्थिक नुकसान; तसेच शेजारील बांगलादेश आणि म्यानमारमधील करोनावाहकांचा धोका याबद्दल चिंता वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.नागरिकांनी पाळलेली शिस्त; तसेच प्रार्थना स्थळे, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न यामुळे मिझोराम करोनामुक्त राहिले आहे, असे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी स्पष्ट केले. राज्याने 'कोव्हिड १९'चा प्रसार रोखण्यात यश मिळवल्याबद्दल आनंद वाटतो.  

'राजस्थानच्या जयपूरमधील सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या तीन करोनाग्रस्त रुग्णांवर करण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपी उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसू येत आहेत. त्यामुळे आणखी दोन रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जाण्याची शक्यता आहे, असे मेडिकल कॉलेजचे डॉ. सुधीर भंडारी यांनी सांगितले.
 

'दिल्लीत आढळून आलेल्या करोना रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्णांमध्ये करोना विषाणूची लक्षणे आढळली नाहीत किंवा सौम्य लक्षणे आढळली आहेत. एकूण ६,९२३ रुग्णांपैकी केवळ १,४७६ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांवर त्यांच्या घरीच किंवा करोना केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णवाहिका कमी पडत असल्याने खासगी रुग्णालयांकडे रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे,' असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. 

 केरळमध्ये आतापर्यंत तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे लॉकडाउन पाळण्यात आला. केरळ सरकारला करोना आटोक्यात ठेवण्यास यश आले असून, जगभरात केरळचे कौतुक होत आहे. राज्यात केवळ सध्या एक करोना रुग्ण असून, ५०५ पैकी ४८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live