एक तृतीयांश जग अजूनही बंद दाराआड, अनेक ठिकाणी निर्बंध, अनेक भागांत लॉकडाऊन

SAAM TV
शनिवार, 13 मार्च 2021

एक तृतीयांश जग अजूनही बंद दाराआड
अनेक ठिकाणी निर्बंध, अनेक भागांत लॉकडाऊन
फक्त दोन टक्केच पर्यटनस्थळं स्वतंत्र

गेल्या वर्षी सात ते आठ महिने लॉकडाऊनचे जे चटके संपूर्ण जगाने भोगलेयत. त्याच्या आठवणी अजूनही लक्षात असतानाच, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचं भूत उभं ठाकलंय.कारण, अजूनही एक तृतीयांश जग कुलूपबंदच आहे.

 सुनसान रस्ते, कडक लॉकडाऊन आणि बंद दारं. अजूनही हे चित्र जगभरातील तब्बल एक तृतीयांश भागात आहे. भारत, महाराष्ट्रासह जगभरात अनेक ठिकाणी कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे पुन्हा निर्बंध आणि पुन्हा लॉकडाऊनच्या चरख्यात जग सापडतंय.
जगभरातली एक तृतीयांश पर्यटन स्थळं अजूनही अनेक निर्बंधांच्या जोखडाखाली दबलीयत. एशिया पॅसिफिकमधील सर्वात जास्त पर्यटनस्थळांच्या सीमा बंद आहेत. तर, त्यानंतर युरोप आणि अमेरिका खंडातल्या पर्यटनस्थळांच्या सीमा कुलूपबंद आहेत. जगभरातील इतर 34 टक्के पर्यटनस्थळं अनेक निर्बंधांनी बांधली गेलीयत.

गेल्यवर्षी तब्बल आठ-दहा महिने कोरोनाच्या विळख्यात आणि लॉकडाऊनच्या चरख्यात संपूर्ण जग भरडून निघालंय. नव्या वर्षात कोरोनावरील लशीमुळे आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, कोरोनाग्रस्तांचे आकडे मात्र वाढतच चाललेयत. त्यामुळे, जगातील अनेक भाग अजूनही निर्बंध आणि लॉकडाऊनमध्येच चाचपडतायत. त्याला आपला भारत आणि महाराष्ट्रही अपवाद नाही. त्यामुळे, कोरोनाबाबतची काळजी ही प्रत्येकाने घ्यायलाच हवी.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live