कांद्याचे लिलाव अखेर सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिष्टाई कामी!

साम टीव्ही
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव अखेर सुरू झालेयत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली शिष्टाई कामी आलीय. कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव अघोषितपणे बंद केले होते. त्यामुळे कांद्याचे दर भडकले होतेच, पण शेतकऱ्याचंही मोठं नुकसान होत होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी यातून मध्यममार्ग काढत ही कोंडी फोडलीय. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत व्यापाऱ्यांना कांदा लिलाव सुरु करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्या पाठोपाठ केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देत कांद्याची खरेदी विक्री, प्रतवारी आणि पॅकेजिंग साठी 3 दिवसांची मुदत दिली आहे, त्यामुळे निर्बंध हटवले नसले तरी, कांदा लिलाव सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आजपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरळीत सुरू झाले आहेत.

परतीच्या पावसाने केलेलं नुकसान, कोरोनाचं संकट आणि त्यात भरीस भर म्हणून लिलाव बंद असल्याने कांद्याचे दर शंभरीपार गेले आहेत. मात्र आता व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केल्यामुळे भरडला गेलेला शेतकरी, कांदा चढ्या दराने खरेदी करणारा ग्राहक आणि कांद्याच्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live