मोदींनंतर आता फडणवीसांना कांदा बिलाची मनिऑर्डर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अंदरसूल - बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी थेट कांदा मालाचे पैसे मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर करून संताप व्यक्त करीत सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी २१६ रुपयांची मनिऑर्डर पाठविली.

चंद्रकांत देशमुख यांनी ५ नोव्हेंबरला पाच क्विंटल कांदा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणला असता त्यांच्या कांद्याला केवळ ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने धक्काच बसला. दिवस-रात्र मेहनत करून पिकविलेला कांदा विकून दोन पैसे हातात येतील, अशी आशा लागली असताना देशमुख यांना पाच क्विंटल ४५ किलो कांद्याचे (गोल्टी) अवघे दोनशे सोळा रुपये मिळाल्याने पिकावर केलेला खर्च तर सोडाच; परंतु वाहतूक खर्चही निघत नसल्याने श्री. देशमुख यांनी मिळालेले २१६ रुपये थेट मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर केले. मनिऑर्डरसाठी अकरा रुपयांचा खर्चही सोसावा लागला.

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर झाला. अहोरात्र राबून पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हा प्रश्‍न आहे. 
- चंद्रकांत देशमुख, शेतकरी, अंदरसूल

Web Title: Onion Bill Moneyorder cheif minister 

संबंधित बातम्या

Saam TV Live