रेल्वेने प्रथमच होणार कांदा निर्यात

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 मे 2020

रेल्वेद्वारे आतापर्यंत बांगलादेशासाठी कधीही कांदा निर्यात झालेली नसल्याने लॉकडाउन काळात ही मोठी बाब असल्याचे सांगितले जात आहे. भुसावळ मंडलातून लासलगाव, निफाड, खेरवाडी या स्थानकांवरून कांदा बांगलादेशात निर्यात करण्यात येत आहे.

भुसावळ रेल्वे विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशात मालगाडीने कांदा निर्यात करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. भुसावळ रेल्वे विभागांतर्गत लासलगाव, निफाड व खेरवाडी या ठिकाणाहून कांदा बांगलादेशात पाठविण्यात येत असून, बुधवारी १७१० टन कांदा रवाना केल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. करोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन असताना व राज्यात अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद असताना भुसावळ रेल्वे विभागातून बांगलादेशात मालगाडीने हजारो टन कांदा निर्यात करण्यात आला आहे. 

रेल्वेद्वारे आतापर्यंत बांगलादेशासाठी कधीही कांदा निर्यात झालेली नसल्याने लॉकडाउन काळात ही मोठी बाब असल्याचे सांगितले जात आहे. भुसावळ मंडलातून लासलगाव, निफाड, खेरवाडी या स्थानकांवरून कांदा बांगलादेशात निर्यात करण्यात येत आहे. लासलगाववरून बुधवारी ४२ वॅगनची पहिली रॅक (मालगाडी), निफाड आणि खेरवाडी स्थानकावरून गुरुवारी प्रत्येकी ४२ वॅगनच्या दोन रॅक रवाना झाल्या. रेल्वे प्रशासनातर्फे व्यापाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून मालवाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे भुसावळ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.करोना संकटामुळे लॉकडाउनची घोषणा झाली व कांद्याची इतर देशांत निर्यात बंद झाली. आता ही निर्यात सुरू झाल्यानंतर भुसावळ रेल्वे विभागातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशात कांदा पाठविण्यात येत असल्याचे चित्र आहे.

 

WebTittle ::Onion export for the first time by rail

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live