कोरोनाच्या संकटामुळे कांदा उप्तादक शेतकरी हवालदिल

साम टीव्ही
शनिवार, 9 मे 2020

कोरोनाच्या संकटामुळे कांदा उप्तादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. लॉकडाऊनमुळे कांद्याला उठाव नसल्यानं नाफेडनं कांदा खरेदी वाढवावी अशी मागणी जोर धरू लागलीय. त्यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरत ट्विटर आंदोलन छेडलंय..

कोरोनाच्या संकटामुळे कांदा उप्तादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय.  लॉकडाऊनमुळे कांद्याला उठाव नसल्यानं नाफेडनं कांदा खरेदी वाढवावी अशी मागणी जोर धरू लागलीय. त्यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरत ट्विटर आंदोलन छेडलंय.

कोरोनाच्या संकटानं आता कांदा उप्तादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. लॉकडाऊनमुळे अनेक बाजारसमित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणंही कठीण होऊन बसलंय. अशात आता नाफेडनं कांद्याची खरेदी 10 लाख टनांपर्यंत वाढवावी अशी मागणी जोर धरू लागलीय.

याशिवाय कांद्याला प्रतिक्विंटल 2000 रूपये भाव द्या अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलंय. आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्विटर आंदोलन छेडलंय. पंतप्रधान मोदींपासून ते प्रत्येक मंत्र्याच्या ट्टिवर हँडलवर #purchase onions support farmers' हा ट्रेंड सुरू करण्यात आलाय. 

 मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून कांदा उत्पादक अडचणीत आहेत. लॉकडाऊनमुळे उत्पादित झालेला माल ग्राहकांपर्यंत पोहचवणं कठीण होऊन बसलंय. आता या शेतकऱ्यांची सारी भिस्त सरकारी धोरणावरच अवलंबून आहे. अन्यथा शेतकऱ्यांची अवस्था खुपच बिकट होईल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live