मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हमुळे बाजार समितीमध्ये कांद्याची वाढली आवक; भाव कोसळले

विश्वभूषण लिमये
रविवार, 4 एप्रिल 2021

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण लॉकडाऊन कारण्यासंबंधात  इशारा दिला आहे. लॉकडाउनच्या भीतीने शेतकऱ्यांनी सर्व कांदा बाजार समितीमध्ये आणला त्यामुळे भावामध्ये काल घट झाली

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 887 कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. दरम्यान परवा रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येत्या दोन दिवसात लॉकडाऊनच्या नियमांबाबत सांगत संपूर्ण लॉकडाऊन कारण्यासंबंधात  इशारा दिला होता. Onion prices plummeted in Solapur

याचा थेट परिणाम सध्या कांद्याच्या भावावर झालेला पाहायला मिळतं आहे.  मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हमुळे (Facebook live) लॉकडाउनच्या (Lockdown) भीतीने शेतकऱ्यांनी सर्व कांदा काल बाजार समितीमध्ये (Onion Market Committee) आणला. आणि यामुळे दररोज शंभर ते दीडशे गाड्यांची होणारी आवक आज तीनशे ते साडे तीनशे गाड्यांवर जाऊन पोंहचली. त्यामुळे 1200 ते 1500 प्रतिक्विंटल असणारे कांद्याचे भाव फक्त  700 ते 1000 रुपयांवर पोहंचले.

मागील लॉकडाऊनमध्ये खरेदी तयार कांदा बाजारात न गेल्याने शेतकऱ्यांचा कांदा बांद्यावरच सडून गेला. तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची विक्री न झाल्याने मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळं यंदा पुन्हा लॉकडाऊन लागेल या भीतीने बाजारात परिणाम जाणवत असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी दिली आहे. Onion prices plummeted in Solapur

Edited by- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live