कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

पाटोदा - दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणले आहे. 

पाटोदा - दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणले आहे. 

हमी भाव नसल्यामुळे कांदा मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. यामधून उत्पादन खर्च तर दूरच मात्र माल बाजारात घेऊन जाण्याचे गाडी भाडे निघणेदेखील मुश्‍किल होऊन बसले आहे. कांदा एक रुपया ते तीन रुपया किलोने विकण्याची वेळ आलेली आहे. यामधून उत्पादन खर्च तर दूरच मात्र बाजारपेठेपर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणारे भाडे खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. तालुक्‍यातील गीतेवाडी (ता. पाटोदा) येथील शेतकरी सुधाकर महादेव गीते यांना आपल्या अर्ध्या एकरमध्ये कांद्याचे जवळपास अडीच ते तीन टन उत्पन्न मिळाले होते. पावसाअभावी उत्पन्नाचे दुसरे काही साधन नसल्यामुळे अगदी मातीमोल किमतीत हा कांदा त्यांच्यावर विकण्याची वेळ आली. गीते यांनी कडा येथील बाजारपेठेमध्ये प्रतिक्विंटल १००  रुपये ते ३०० रुपये म्हणजेच १ रुपया किलोपासून ते ३ रुपयांपर्यंत भाव मिळाला. यामधून त्यांचा उत्पादन खर्च तर तर दूरच उलट गाडीचे भाडेदेखील स्वखर्चाने करण्याची वेळ आली आहे.

कांदा लागवडीसाठी मशागत, रोपे खरेदी खते, पाणी, मजुरी, वाहतूक गोण्या, अडत, हमाली असा सर्व खर्च होतो. शेतकऱ्यांना सहा महिने शेतात राब राब राबून कांद्याची काळजी घ्यावी लागते. आज मिळणाऱ्या भावाचा विचार करता, उत्पादन खर्चही निघत नाही. अगोदरच कांदा पिकासाठी बाहेरून उचललेला पैसा, विकास सोसायटीचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता भेडसावत आहे. 
- सुधाकर महादेव गीते, शेतकरी

शासनाने कांद्याला जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समाविष्ट केले असले तरी अद्यापही कांद्याला हमीभाव का नाही. कृषिमूल्य आयोगाने शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा चालवलेली आहे.
- विष्णुपंत घोलप, शेकाप नेते

Web Title: Onion Rate Decrease Farmer Loss


संबंधित बातम्या

Saam TV Live