दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव वधारणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पिंपळनेर - साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथील उपबाजार समितीत आज कांद्याला ३१०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. समितीत आज सुमारे ५०० हून अधिक वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आता शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात उन्हाळ कांदा शिल्लक असून, राज्यात सर्वत्र कांद्याचे दर कडाडले आहेत. मात्र, या वाढीव दराचा फायदा कमी शेतकऱ्यांना होत आहे. दिवाळीपर्यंत कांद्याचे दर असेच कडाडलेले राहतील, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.

येथील उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी होत आहे. केवळ २००० ते २४०० रुपये भाव मिळत असताना परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली. दुसरीकडे तीन- चार दिवसांपासून मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात आज ३४०० रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या शेतकऱ्यांकडे अगदी कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे, त्यामुळे भाव वाढला; परंतु शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही, अशी स्थिती झाली आहे. 

उपबाजार समितीत आज पाचशेहून अधिक वाहनांतून सुमारे ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी ३१०० आणि जास्तीत जास्त ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आज सकाळी अकराला कांदा लिलावाला सुरवात झाली.

Web Title: Onion rate Increase in Diwali

संबंधित बातम्या

Saam TV Live