Corona Effect | सोन्या-चांदीच्या दुकानात कांदे विक्री !

साम टीव्ही
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनामुळे सराफा व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं 

सोन्या-चांदीच्या दुकानात कांदे विक्री !

उदरनिर्वाहासाठी व्यापाऱ्यांनी शोधला नवा पर्याय

लॉकडाऊनमुळे सर्वांचंच कंबरडं मोडलंय. सराफा व्यावसायिक देखील त्याला अपवाद राहिलेले नाहीत. सण-उत्सव गेले, लग्नसराईचा हंगाम निघून गेला. व्यापार बसल्यानं एका सराफा व्यावसायिकानं चक्क आपल्या ज्वेलर्स दुकानात होलसेल भावात कांदाविक्री सुरू केलीय. कुठे घडलाय हा प्रकार, तुम्हीच पाहा.

 

- दूरवरून पाहिल्यनंतर तुम्हाला हे दुकान ज्वेलर्सचं दुकान असल्याचं दिसेल, पण इथं सोन्या ऐवजी कांद्याचा व्यापार सुरू आहे. हे चित्र आहे रायगड जिल्ह्यातल्या पालीतलं...यंदा लॉकडाऊनमुळे सणा-सुदीचा हंगाम असाच गेला. लग्नसराईतही लग्न लागलीच नाहीत. त्यामुळे सोन्याची खरेदीच झाली नाहीत. त्यातच सोन्याचा भाव 47 हजारांवर गेल्यानं आता सोनं खरेदीसाठी कुणी फिरकेना अशी स्थिती आहे. त्यामुळे या दुकानाचे मालक रवी ओसवाल यांनी चक्क होलसेल कांदेविक्रीचा नवा व्यापार सुरू केलाय. सोन्यापेक्षा कांदा बरा असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. 

फायनल व्हीओ - कोरोना संकटांना सराफा व्यावसायिकांचं कंबरडं मोडलंय. ज्या लोकांनी जुन्या भावात सोन्याचं बुकींग गेलं त्यांना चढ्या भावात सोनं खरेदी करून देण्याची वेळ सोनारांवर आलीय. बुडीत जाण्यापेक्षा दुसरा कोणता तरी धंदा करावा हाच विचार आता सराफा व्यापारी करू लागलेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live