पैसे गेले, दारु काही मिळालीच नाही, मद्यप्रेमींची ऑनलाईन फसवणूक

साम टीव्ही
शुक्रवार, 15 मे 2020
  • मद्यप्रेमींची ऑनलाईन फसवणूक
  • फेसबूक पेजवरुन मागवली दारू
  • पैसे गेले, दारु काही मिळाली नाही

पंढरपूर: या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन दारु खरेदी करत असाल तर ही बातमी बघा. आणि सावध व्हा. दारुची तलप तुम्हाला महागात पडू शकेल. लॉकडाऊनमध्ये मध्यप्रेमींच्या जीवाची घालमेल सुरु आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारनेही ऑनलाईन दारुविक्रीला परवानगी दिलीए. मात्र याचा गैरफायदा घेत, काहींनी मद्यप्रेमींना लुबाडलं. हा सगळा प्रकार घडलाय, तो पंढरपुरात.

त्याचं झालं अंस, रॉय वाईन्स या नावाने एक फेसबूक पेज तयार करण्यात आलं. अनेक मद्यप्रेमींना हे पेज लाईक केलं. काहींनी यावरुन ऑर्डर केली. काही अतिउत्साही मद्यपींनी तर पैसेही भरले. मात्र दारु काही मिळाली नाही.

 वाईन शॉपच्या मालकांनी तर जबाबदारी झटकलेय. त्यामुळे आता मद्यप्रेमींना फसवणारे हे ऑनलाईन चोरटे आहेत तरी कोण? याचा शोध पोलिसांना घ्यायचाय. पण दारु मिळवण्यासाठी काहीही करु पाहणाऱ्या मद्यप्रेमींना या बातमीतून तरी धडा घ्यायला हवाय. दिवस संयम राखण्याचे आहेत... उतावीळ होण्याचे नाहीत. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live