अडीच हजार रुपये परत मिळवण्याच्या नादात पेट्रोलपंप चालकाने गमावले 2 लाख 35 हजार रुपये

भूषण अहिरे
गुरुवार, 20 मे 2021

राजू येलेकर यांच्या मोबाईलवर येत असलेल्या ओटीपी च्या माध्यमातून अडीच हजार रुपये कट झाले. पैसे कट झाल्यामुळे, कट झालेले पैसे परत मिळवण्याच्या नादात पेट्रोल पंप चालकाचे तब्बल दोन लाख 35 हजार रुपये हॅकरने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. 

धुळे : धुळे Dhule शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोळीबार टेकडी परिसरातील कालिकादेवी नगरात रहाणाऱ्या पेट्रोलपंप चालक, राजू येलेकर यांच्या मोबाईलवर येत असलेल्या ओटीपी OTP च्या माध्यमातून अडीच हजार रुपये कट झाले. पैसे कट झाल्यामुळे, कट झालेले पैसे परत मिळवण्याच्या नादात पेट्रोल पंप चालकाचे तब्बल दोन लाख 35 हजार रुपये हॅकरने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. Online Money Fraud by hacker of 2 lakh 35 thousand in dhule

हे देखील पहा -

आपले अडीच हजार रुपये गेलेले परत मिळवण्याचा नादामध्ये गुगल पे Google Pay वरील कस्टमर केअर शी संपर्क करून तब्बल एक तास बोलत त्यांनी गेलेल्या पैशांबाबत माहिती दिली. त्यानंतर समोर कस्टमर केअर वरील इसमाने मोबाईल मधील ज्या ज्या फंक्शनला ऑपरेट करायला सांगितले त्या पद्धतीने येवले यांनी फंक्शन ऑपरेट केले आणि त्यानंतर तब्बल 2 लाख 35 हजार रुपये पेट्रोल पंप चालक येवले यांना गमवावे लागले आहेत.

शिवसेनेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांचे आभार मानत पेढे वाटले, 'हे' आहे कारण....

याबाबत येवले यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये Police Station धाव घेतल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासासाठी आता सायबर गुन्हे अन्वेषण विभागामध्ये ही तक्रार वर्ग करण्यात आली आहे. असे असून अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने गंडा Cyber Crime घालणाऱ्यांची धुळ्यामध्ये चांगलीच दहशत वाढली असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live