VIDEO | ऑनलाईन व्यवहार करताना सावधान! पाहा कशी झालीय कोट्यावधींची फसवणूक

साम टीव्ही
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल किंवा ऑनलाईन गुंतवणूक करत असाल तर सावध राहा. कारण जालन्यात घडलेली घटना आपल्याला खूप काही शिकवून जाईल. पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून-

आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल किंवा ऑनलाईन गुंतवणूक करत असाल तर सावध राहा. कारण जालन्यात घडलेली घटना आपल्याला खूप काही शिकवून जाईल. पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून-

 तुम्ही वेबसाईटवरून पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला कुणी आमिष दाखवत असेल तर ही बातमी नक्की बघा... कारण जालन्यात वैबसाईटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात आलीय.

GFX IN
वेबसाईटवरून कशी केली फसवणूक?
बनावट वेबसाईटद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक केलीय. ही टोळी बनावट वेबसाईट बनवून शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो असं सांगून फसवणूक करत होती. एका शिक्षकानं तक्रार दिल्यानंतर ५ जणांना मध्यप्रदेशातून अटक केलीय. आरोपीकडून लॅपटॉप, मोबाईल, डेबिट कार्ड, बँकांचे चेकबुक हार्डडिस्क आणि कार असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
GFX OUT

हल्ली ऑनलाईन व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढलाय, मात्र, जालन्यात घडलेला प्रकार पाहता, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live