थेट सिंधुदुर्गातून ऑनलाईन भाजीविक्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कणकवली - जिल्ह्यातील 14 कृषी पदवीधर तरूणांनी कोकण ऍग्रो फेसबुक पेज आणि व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून नैसर्गिक भाजीपाला पुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू केला असून जिल्ह्याच्या विविध भागातून नियमीत लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी ऑनलाईन नोंदविण्यात येत आहे.

ताजा भाजीपाला घरपोच केला जाणार आहे. यासाठी येत्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील काही भागामध्ये नैसर्गिक भाजीपाला शेती केली जाणार आहे. या आगळ्या वेगळ्या धाडसी पाऊलातून नव्या पिढीला शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

दिग्विजय राणे या तरूणाने ऍरॉनॉटीक सायन्स ही पदवी घेतली आहे. त्यांच्यासोबत ऍग्रीकल्चरची डिग्री घेतलेले सहा तरूण ऍग्रीकल्चर डिप्लोमा तसेच ऍग्रीकल्चर मॅनेजमेंटमधील पदवीधर एकत्र येवून ही संकल्पना मांडली आहे. त्यांचे कोकण ऍग्रो डॉट कॉम हे संकेतस्थळ एक महिन्यापूर्वी सुरू झाले. तसेच फेसबूक आणि व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून सेंद्रीय आणि नैसर्गिक भाजीपाला तयार करून पुरवठा केला जाईल अशी नोंदणी सुरू केली. या नोंदणीत जवळपास 60 टक्के पुरूष आणि 30 टक्के महिलांनी सहभाग घेवून रोजच्या आहारातील टॉमॅटो, गावठी कांदा, हिरवी मिरची, आले, ग्रामीण भागातील पालेभाज्या यांची मागणी नोंदविली आहे.

कणकवलीत साधारण 41 टक्के तर उर्वरीत तालुक्‍यात सरासरी 10 टक्के नोंदणी या संकेतस्थळावरून झाली आहे. या पदवीधर तरूणांनी कणकवली तालुक्‍यातील कासरल, वाघेरी, हुंबरट येथे हा नैसर्गिक भाजीपाला तयार करण्याचे प्लॉट निश्‍चित केले आहेत. संकेत स्थळावर ई कॉमर्स स्टोर्स असून ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. सद्यस्थीतीत या पदवीधर तरूणामधील काही जण शेती व्यवसायात आहेत. दुग्धजन्य पदार्थ विक्री आणि शेतीपूरक व्यवसायातही या तरूणांनी काम सुरू केले आहे. 

सुशिक्षित तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न 
जिल्ह्यातील तरूणांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय उभे केले पाहिजेत. यासाठी प्रेत्यक गावातील तरूणांना सहभागी करून घेतले जाईल आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांच्या मागणीचा पुरवठा तोही घरपोच करण्याचा आमचा संकल्प आहे असे मत कृषी पदवीधर दिग्विजय राणे याने म्हटले आहे. पहिल्या टप्प्या भाजीपाला आणि नंतर शेतीपूरक उत्पादने ऑनलाईन पद्धतीने विक्रीचा प्रयत्न राहील. सध्या तर या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिग्विजयचे म्हणणे आहे.  

Web Title: Online vegetable purchase in Sindhudurg
 
संबंधित बातम्या

Saam TV Live