पुणेकरांना दिलासा; पुण्यात आज केवळ १८० रुग्णांची नोंद

covid19
covid19

पुणे - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. मात्र असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्या आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे. Only 180 patients were registered in Pune today

पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोना ने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.  मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकुण रुग्ण १८० रुग्णांची नोंद झाली आहे तर   ७५१ रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. 

हे देखील पहा -

राज्यात आता रोजच्या करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा को  कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.   Only 180 patients were registered in Pune today

पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ६९ हजार ९२७ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ८ हजार २५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ७५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४ लाख५५ हजार ६५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात सध्या ६ हजार ०२० रुग्णांवर उपचार उपचार सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com