परराज्यातील मजुरांनाच मुंबई, पुण्यातून सोडणार

 परराज्यातील मजुरांनाच मुंबई, पुण्यातून सोडणार

मुंबई: मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांत जे परराज्यातील मजूर अडकून पडले आहेत. त्यांना महाराष्ट्राबाहेर आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील करोना प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागाच्या पोलिस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. 

क्षेत्रात अडकलेल्या परप्रांतातील मजुरांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असा खुलासा राज्य सरकारनेच केला आहे.पोलिस आयुक्तालय असलेल्या शहरात आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना देण्यात आले असले तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही. 

ज्या शहरांमध्ये पोलिस आयुक्तालये आहेत त्या शहरांमध्ये जिल्ह्याच्या बाहेर किंवा राज्याच्या बाहेर जाण्याच्या परवानग्या देण्यात येत आहेत.
 मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात असलेला करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या दोन्ही क्षेत्रांतून महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत किंवा अन्य जिल्ह्यांतून या क्षेत्रांमध्ये येण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

WebTittle ::  Only foreign workers will be released from Mumbai and Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com