ट्रम्पच अमेरिकेला वाचवू शकतात, ओसामा बिन लादनेच्या पुतणीचं विधान

साम टीव्ही
सोमवार, 7 सप्टेंबर 2020
  • ट्रम्पच अमेरिकेला वाचवू शकतात
  • ओसामा बिन लादनेच्या पुतणीचं विधान
  • ट्रम्प असतील तर पुन्हा 9/11 सारखा हल्ला होणार नाही

अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आणि त्याआधी एक असं विधान समोर आलंय. ज्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतोय. हे विधान केलंय, ओसामा बिन लादेन याच्या पुतणीने... हे विधान नेमकं काय आहे, आणि याचा या निवडणुकीवर किती प्रभाव पडू शकतो, वाच...

ओसामा बिन लादेन याच्या भ एक मोठं विधान केलंय. ओसामाची भाची नूर बिन लादिन  ने म्हटलंय की जगात फक्त डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेला ९-११ सारख्या दहशतवादी हल्ल्यापासून वाचवू शकतात. यापुढे जाऊन नूर बिन लादिन हिने असंही म्हटलं आहे, की जर जो बाईडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर पुन्हा ९-११ सारखा हल्ला अमेरिकेत होऊ शकतो. अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अमेरिका.

हे वक्तव्य करणारी नूर बिन लादिन ही मूळात अमेरिकेत राहत नाही. तर ती स्वित्झरलँडमध्ये राहते. नूर ही ओसामा बिन लादेनच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. नूरच्या आईने घटस्फोट घेतल्यापासूनच लादेन कुटुंबीयांशी कायमच दूर राहणं पसंत केलं. म्हणूनच त्यांनी आपलं आडनावही लादेन ऐवजी लादिन असं आडनाव लावतात.

अमेरिकेतील निवडणूक जवळ आलेय. आणि अशात नूर बिन लादिनचं हे वक्तव्य अर्थातच या टायमिंगमुळे महत्त्व घेऊन गेलंय. मात्र याचा ट्रम्प यांना प्रत्यक्षात किती फायदा होईल, हे तर येणारा काळच सांगेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live