VIDEO | अरेरे! असले उपद्व्याप नका करु...क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला आणि ती खिडकीत अडकली

अंकिता सोनवणे
मंगळवार, 16 मार्च 2021

अरेरे! असले उपद्व्याप नका करु जीवाला घोर लावणारी भीती दायक हास्यास्पद अशी ही अगळी वेगळी बातमी साम टीव्ही मार्फत घेऊन येत आहोत ....

 

जीवाला घोर लावणारी भीती दायक हास्यास्पद अशी ही आगळी वेगळी बातमी साम टीव्ही मार्फत घेऊन येत आहोत .

अरेरे! असले उपद्व्याप नका करु...क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला आणि ती खिडकीत अडकली
मुळची दिल्लीची रहिवासी असणारी एक 18 वर्षीय तरुणी कोरोनाच्या विळख्यात अडकल्या मुळे तिला पुणे येथील एरंडवणा क्वारंटाईन सेंटर मध्ये तिला क्वारंटाईन करण्यात आले . माञ  क्वारंटाईन सेंटर मधून पळून जाण्याचा प्रयत्न तरुणीच्या चांगलाच अंगलट आला असल्याची बातमी कळते क्वारंटाईनच्या सुटकेतून मुक्ततता मिळावी यासाठी तिने अत्यंत भयानक प्रयत्न केला . तो म्हणजे पुणे एरंडवणा क्वारंटाईन सेंटर च्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकिच्या गजामधून म्हणजेच खिडकीच्या छोट्याश्या फटीमधून तिने पळायचा प्रयत्न केला

. तिने हा प्रयत्न राञी साडे अकराच्या सुमाराम केला पण तिचा हा प्रयत्न असफल झाला आणि दुसरीच अडचण पुढ्यात येऊन उभी राहीली . ती म्हणजे खिडकीच्या छोट्याश्या फटीतून बाहेर पडण्याच्या फिराक्यात तिने अगळी वेगळी पद्धत अवलंबली माञ त्यामुळे ती त्या खिडकीच्या फटीत मधल्या मध्ये अरध्यावर म्हणजे चक्क खिडकीत अडकली .

तिने मदतीची हाक मारली आता ह्या तरुणीची खिडकीतून सुटका करण्यासाठी थेट फायरब्रिगेडला पाचारण करण्यात आले म्हणजेच बोलवण्यात आले . माञ  तरुणीने स्वत:च अंमलात आणलेल्या प्रयत्नांना ती स्वत:च घाबरली माञ ह्या घाबरलेल्या तरुणीला आपल्या देशाच्या जवानांनी धीर दिला आणि हायड्रोलिंक कारच्या सहाय्याने तिची त्या खिडकीतून सुखरुप पणे सुटका करण्यात आली . असे 
प्रकार कोणाही करु नयेत .

म्हणूनच नियम पाळा , काळजी घ्या , अडचणी टाळा असा मेसेज वारंवार महाराष्ट्रात फिरतो आहे . 
                                                              

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live