mucormycosis
mucormycosis

बुलढाण्यात कोरोना नंतर म्युकर मायकोसिसने काढले डोके वर !

बुलढाणा: अगोदरच बुलढाणा Buldhana जिल्ह्यात कोरोनाचा Corona कहर पाहायला मिळत आहे. तोच दुसऱ्या गंभीर आजाराने तोंड वर काढले आहे. म्युकरमायकोसिस Mucormycosis या नवीन आजाराचे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज जिल्ह्यात 36 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 4 रुग्णांचा मृत्यु झाला असून 17 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भुसारी यानी दिली. त्यामुळ आरोग्य प्रशासन खड़बडून जागे झाले आहे. Operated a separate ward for Mucormycosis in the District General Hospital Buldhana 

बुरशीजन्य Fungal आजाराची ओळख असणाऱ्या म्युकरमायकोसिस या नावाने प्रचलित आहे. हा आजार ज्यांना कोविड होऊन गेला आहे व डाईबेटिस Diabetes असलेल्याना होत असल्याचे डॉ सांगत आहे.

हे देखील पहा -

जिल्ह्यात आता रुग्णसंख्या वाढत चालली असल्याने, जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उघड़न्यात आला आहे. म्युकरमायकोसिस च्या रुग्णावर उपचार केला जात आहे. या आजाराला लागणारी यंत्र सामग्री उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करुन रुग्णांना इतर जिल्ह्यात रेफर केल्या जात आहे.

हा अतिखर्चिक आजार असल्याने काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकार्यशी संपर्क करुन उपचार घेण्याचे आवाहन सुद्धा कान नाक घसा चे वैद्यकीयतज्ञ डॉ सुशील चव्हाण यांनी केले आहे. कोविड सपोर्ट आजार असल्याने तोंडावर लावलेला मास्क दररोज धुवून स्वच्छ करीत मगच वापरावा असे नागरिकांना आवाहन सुद्धा केले आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com