शरद पवारांवर होणार उद्या शस्त्रक्रीया; नवाब मलिकांची माहिती

साम ब्युरो
सोमवार, 29 मार्च 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर तेथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

मुंबई :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही माहिती दिली आहे. Operation will be performed on Sharad Pawar at Breech Candy Hospital

काल सायंकाळी पोटदुखीचा त्रास जाणवल्यानंतर पवार (Sharad Pawar) यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर एंडोस्कोपी व पित्ताशयाची शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. Operation will be performed on Sharad Pawar at Breech Candy Hospital

पवार यांना सध्या सुरु असलेली रक्त पातळ होण्याची औषधे थांबवण्यात आली असून उद्या (ता. ३१) एंडोस्कोपी झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात येईल, असेही मलिक यांनी सांगितले आहे. 

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live