वाचा, मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचं मत

साम टीव्ही
मंगळवार, 7 जुलै 2020

मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलंय. हे आरक्षण टिकवण्याचं महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. दरम्यान न्यायलयाच्या मतावर आम्ही खूष असल्याचं विनोद पाटील म्हंटलंय.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गुंतागुतीचा असून यासंदर्भातील निकाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन देणं कठीण असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय.

बुधवारी म्हणजेच 15 जुलैला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामधील आरक्षणाविरोधातील याचिकांवर अंतरिम आदेश येण्याची शक्यता आहे.  न्यायमुर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलंय. हे आरक्षण टिकवण्याचं महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. दरम्यान न्यायलयाच्या मतावर आम्ही खूष असल्याचं विनोद पाटील म्हंटलंय. आता सरकारची खरी लढाई सुरू झालीय असंही ते म्हणालेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live