महाआघाडीला धोका, सपा-बसपाची स्वतंत्र आघाडी ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

लखनौ- लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून घेणार आहेत.

लखनौ- लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून घेणार आहेत.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये बसपा, सपा आणि राष्ट्रीय जनता दलाने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र देखील ठरले आहे. बसपा 38, समाजवादी पक्ष 37 आणि राष्ट्रीय जनता दल 3 जागा लढवणार आहे. तर रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप बसपा, सपा किंवा काँग्रेस नेत्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

काँग्रेससाठी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, उत्तर प्रदेशमधील महाघाडीत काँग्रेसला मानाचे स्थान न मिळाल्याने राहुल गांधींसाठी हा हादरा मानला जात आहे. तसेच स्वतंत्र महाआघाडी करून भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कडवे आव्हान देण्याच्या त्यांच्या मनसुब्यांना हा बसलेला हा हादरा मानला जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील 80 पैकी तब्बल 73 जागांवर विजय मिळवून सगळ्याच पक्षांना हादरा दिला होता. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला पाच तर काँग्रेसला फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता. मायावती यांच्या बसपाला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. मात्र, गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेसाठी तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यात समाजवादी आणि बसपाने एकत्र येत भाजपाला हादरा दिला होता.

Web Title:Opposition Unity Questioned As Sp And Bsp Skips Briefing No Meet Over House Strategy With Congress


संबंधित बातम्या

Saam TV Live