३५ वर्षांतला सर्वाधिक पाऊस; राजधानी दिल्लीला पावसामुळे 'आॅरेंज अॅलर्ट

Heavy Rain Fall in Delhi
Heavy Rain Fall in Delhi

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत New Delhi कालपासून जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातली व्यवहार ठप्प झाले आहेत. या पावसामुळे हवामान विभागाने शहराला आॅरेंज अॅलर्ट दिला आहे. Orange Alert Sounded in New Delhi due to heavy rains

कालपासून हा पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहनांची गती मंदावली असून सर्वोच्च न्यायालजवळील Supreme Court of India भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. महाराष्ट्र Maharashtra  व गुजरातला ज्या तौत्के चक्रीवादळाचा Tauktae Cyclone फटका बसला त्याच चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. शेजारील हरयाणामध्येही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीत आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ११८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या ३५ वर्षांतला हा सर्वाधिक पाऊस आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर प्रदेश, राजस्थानचा उत्तरेकडचा भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी जोरदार वादळी पाऊस झाला. राजस्थानात पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. Orange Alert Sounded in New Delhi due to heavy rains

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com