जुन्नर, मंचरमध्ये शुकशुकाट; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तालुक्यात जमावबंदी

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

राज्यसरकारच्या आदेशानुसार कोरोना (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात, शहरात तसेच गावागावांमध्ये अनेक ठिकाणी मिनी लॉकडाउन काढण्यात आले आहे

पुणे : राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी  संपूर्ण राज्यामध्ये शहरात तसेच गावागावांमध्ये अनेक ठिकाणी मिनी लॉकडाउन  लावण्यात आला आहे. त्यामध्ये प्रशासनाने पाच पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गाव व शहरातील परिसराला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ज्या शहर व गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण असतील त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून आजपासून पुढील दहा दिवस जाहीर करण्यात येत असून औद्योगिक क्षेत्र सुरू राहणार आहे. (Order of lockdown and curfew in Junnar  Ambegaon taluka by the order of the District Collector)

हेही वाचा - १० वी १२वी च्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय - वर्षा गायकवाड

त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव (Junnar, Ambegaon) तालुक्यातील गावामध्ये आज सकाळपासूनच पोलिसांनी ज्या त्या पोलीस ठाण्यात हद्दीतील गावामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणतेही दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. आंबेगाव, जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शेती संबंधित खते, औषधांची दुकाने 5 दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनानी दिली आहे. या आवाहनाला प्रतिसाद संपूर्ण जुन्नर, मंचर शहरातील नागरीकानी दुकाने बंद केली आहेत. यामुळे संपूर्ण जुन्नर, मंचर शहरात शुकशुकाट पसरल्याचे चित्र आढळून आले आहे. हीच परिस्थित जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील इतर गावामधे दिसून येत आहे. शासनाच्या या निर्णयाबददल नागरीकामध्ये मात्र समिश्र भुमिका दिसून येत आहे.

Edited By - Digambar Jadhav. 


संबंधित बातम्या

Saam TV Live