अनाथ मुलीला ग्रामपंचायतीनं घेतलं दत्तक; ठाणेदारानं केलं कन्यादान

wedding
wedding

वाशिम: मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील दीक्षा डाखोरे यांच्या वडिलांच 15 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर तिच्या आईने तिचा सांभाळ केला मात्र कालांतराने आईचंही निधन झालं.  त्यानंतर अनाथ मुलींचं कुटुंब ग्रामपंचायतने दत्तक घेतले आणि त्यांचा सांभाळ केला. आज मुलगी उपवर झाल्यामुळे तिचा विवाह नांदेड जिल्ह्यातील पळसा येथील निखिल गावंडे यांच्याशी जुळला मात्र लग्नाची जबाबदारी कुणी घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर ग्रामपंचायतने मासिक सभा घेऊन लग्नाचा खर्च करण्याच ठरविले.

कारखेडा येथे एका अनाथ मुलीचं लग्न ठरलं हे माहीत झाल्यावर मी स्वतःहून कन्यादान करण्याचं ठरवलं आणि मला मुलगी नसल्याने माझ्या हाताने कन्यादान होईल का नाही. अस वाटलं होतं मात्र आज मी दिक्षाचं कन्यादान केल्यामुळं मला एक मुलगी असल्याची जाणीव झाल्याचं ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितलय. (Orphan girl adopted by Gram Panchayat Kanyadan was done by a police officer)

हे देखील पाहा

दीक्षा डाखोरे या अनाथ मुलीचं लग्न ठरल्याचे समजल्यावर मी सरपंच याना फोन करून मुलीचा मामा होऊन मी लग्नात सहभागी होणार असल्याचे म्हटले आणि मला ती संधी मिळाली त्यामुळं मी माझं भाग्य समजतो असे विस्तार अधिकारी संजय भगत यांनी सांगितले. त्याचबरोबर, लहानपणीच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तर काही दिवसांपूर्वी आईचं निधन झालं. त्यामुळे माझं लग्न कसं होईल असा प्रश्न होता मात्र ग्रामपंचायतने माझ्या लग्नाचा खर्च केला तर वडील म्हणून ठाणेदार यांनी भूमिका पार पाडली त्यामुळं मला आईवडीलांची आठवण झाली नसल्याच दीक्षांने सांगितले. 

राज्यभरात आई वडिलांचे छत्र हरविलेले अनेक अनाथ मुलं मुली असून,त्यांची हेळसांड होताना आपण बघतो. मात्र कारखेडा ग्रामपंचायत अशा अनाथ मुलांना दत्तक घेवून त्यांची सर्वच जबाबदारी घेत आहे. तर आज अशाच एका अनाथ दिक्षाचं लग्न करून कुटुंब प्रमुखांची भूमिका पार पाडली. यांच्याप्रमाणेच राज्यातील इतर ग्रामपंचायतने हा आदर्श घेतला तर अनाथ मुलांना खरा न्याय मिळेल यात मात्र शंका नाही.

Edited By: Pravin Dhamale 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com