अणदूरची जुळी भावंडं पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात भरती...

विश्वभूषण लिमये
सोमवार, 29 मार्च 2021

अणदूर गावातील रहिवासी असलेले आकाश बापूराव माने आणि विकास बापूराव माने ही जुळी भावंड पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात भरती झाली आहेत.

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील अणदूर गावातील रहिवासी असलेले आकाश बापूराव माने आणि विकास बापूराव माने ही जुळी भावंड पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात भरती झाली आहेत. Andoors twin brothers joined the army in the first attempt 

डिसेंबर महिन्यात हैद्राबाद येथे झालेल्या भारतीय सैन्य दलाच्या भरतीत हे दोघे सहभागी  झाले होते.या अगोदर कराटे या शारीरिक खेळाच्या माध्यमातून या भावंडांनी राज्य पातळीवर अनेक क्रमांक देखील पटकावले आहेत.त्यांचे वडील बापूराव माने यांनी भारतीय सैन्य दलात 28 वर्ष सेवा केली. सुभेदार म्हणून शेवटी ते सैन्य दलातून निवृत्त झाले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली या भावंडांनी आपले प्रशिक्षण घेतले आणि घवघवीत यश संपादन केलं.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live