आमचा कोकण, नी.. आमचो राणो

विनोेद तळेकर
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019


'आमचो राणो'..ही एकेकाळी त्यांच्याबद्दल प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात असलेली आपलेपणाची भावना ओसरून आता काही वर्षे लोटलीत.. शिवाय 'कोकणचा हुकमी एक्का' हे राजकीय दरबारी असलेलं त्यांचं बिरूद गळून पडल्यालाही आता बराच कालावधी लोटलाय..एवढच नाही त्यांच्या हक्काच्या मातीत एका पोरगेल्याशा तरूणाकडून पदरी पडलेल्या पराभवालाही आता तब्बल पाच वर्ष झालीत. तरीही आज कोकणातलं, त्यातही विशेषत: तळकोकणातलं राजकारण नारायण राणेंच्या नावाशिवाय पुढे सरकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र एकेकाळी राज्याच्या राजकारणावर प्रभाव राखून असलेल्या राणेंना सध्या आपल्याच एकेकाळच्या बालेकिल्ल्यातल्या कुठल्याशा एका विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय. आतापर्यंत प्रत्येक राजकीय डाव आपल्या अटीशर्तींवर खेळणारे राणे यावेळी मात्र भाजपच्या अटीशर्तींवर भाजपमध्ये प्रवेश करते झाले.

'आमचो राणो'..ही एकेकाळी त्यांच्याबद्दल प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात असलेली आपलेपणाची भावना ओसरून आता काही वर्षे लोटलीत.. शिवाय 'कोकणचा हुकमी एक्का' हे राजकीय दरबारी असलेलं त्यांचं बिरूद गळून पडल्यालाही आता बराच कालावधी लोटलाय..एवढच नाही त्यांच्या हक्काच्या मातीत एका पोरगेल्याशा तरूणाकडून पदरी पडलेल्या पराभवालाही आता तब्बल पाच वर्ष झालीत. तरीही आज कोकणातलं, त्यातही विशेषत: तळकोकणातलं राजकारण नारायण राणेंच्या नावाशिवाय पुढे सरकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र एकेकाळी राज्याच्या राजकारणावर प्रभाव राखून असलेल्या राणेंना सध्या आपल्याच एकेकाळच्या बालेकिल्ल्यातल्या कुठल्याशा एका विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय.

 

आतापर्यंत प्रत्येक राजकीय डाव आपल्या अटीशर्तींवर खेळणारे राणे यावेळी मात्र भाजपच्या अटीशर्तींवर भाजपमध्ये प्रवेश करते झाले. राणेंच्या राजकीय कारकीर्दीतल्या या स्थित्यंतराची कारणंही राणेंच्याच कार्यपद्धतीत आणि काही अंशी त्यांच्या स्वभावात आहेत.

शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केलेल्या राणेंच्या राजकीय जीवनात नगरसेवक, मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीचं म्हणजे बेस्टचं अध्यक्षपद, आमदारकी, मंत्रीपद आणि अखेर मुख्यमंत्रीपद ही सारी पदं आली. विशेष म्हणजे ज्या मुख्यमंत्रीपदासाठी राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर जंगजंग पछाडलं ते मुख्यमंत्रीपदही राणेंना शिवसेनेतच असताना मिळालं होतं. तरीही त्यांनी शिवसेना सोडली...पण का? 

 

तर या का?चं उत्तर शोधताना आणि त्यांच्या सेना सोडण्याच्या कृतीचं राजकीय विश्लेषण करताना राणेंचं २००५ सालातलं महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही. उण्यापुऱ्या सहा - आठ महिन्यासाठी मिळालेलं मुख्यमंत्रीपद राणेंना पुन्हा हवं होतं. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला राणे तयार होते. पुढे १९९९ साली युतीचं सरकार गेलं आणि राणेंना विरोधी बाकावर बसावं लागलं. बरं त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून राणेंचा दबदबा काही कमी नव्हता. तरीही विरोधी पक्षनेता असलेल्या राणेंच्या विधानसभेतल्या आसनापासून अवघ्या पंचवीस फूटावर असलेल्या मुख्यमंत्रीपदाचं आसन त्यांना स्वस्थ बसू देईना. पण सत्तेसाठी लागणारं संख्याबळ तर राणेंच्या महत्वाकांक्षेच्या पुर्ततेसाठी पुरेसं नव्हतं… मग इथेच राणेंनी पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी बाळासाहेबांच्या परवानगीने एक डाव टाकला. तो डाव होता त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसचे आमदार फोडून विलासराव देशमुखांचं सरकार पाडण्याचा..यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. एक दोनदा नव्हे तर तब्बल चारदा त्यांनी हा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात राणेंना यश काही आलं नाही. मग २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने राणेंनी सत्तेसाठी जोर लावला. पण निकालानंतर राणेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं. राणेंवर पुन्हा विरोधातच बसण्याची पाळी आली, तेव्हा मात्र राणेंचा धीर सुटला. विरोधी बाकावर जेमतेम आठ दहा महिने काढल्यानंतर राणेंनी मग सरकार पाडण्याऐवजी थेट सत्तेत जाणंच पसंत केलं. जुलै २००५ साली राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राणेंचं राजकीय वजन त्यावेळी इतकं होतं की कोकणासह राज्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाही राणेंच्या काँग्रेस प्रवेशाला पक्षश्रेष्ठींनी प्राधान्य दिलं. त्यांच्या शपथविधीनंतर राजभवनावरच झालेल्या एका छोटेखानी पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी राणेंचं अगदी 'गर्मजोशी'ने स्वागत केलं. शिवाय, "हमारी पार्टी इतनी बडी है, की राणेजी को यहा फैलने के लिए काफी जगह है" असं एका हिंदी भाषिक पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत विलासरावांनी राणेंचा 'अहंगंड'ही कुरवाळला. राणेंच्या महत्वाकांक्षेला विलासरावांनी पुरवलेलं हे इंधन पुरेसं होतं. इथंच राणेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेनी इथं पुन्हा एकदा उचल खाल्ली. पण काँग्रेसची ‘थंडा करके खानेका’ ही संस्कृती आणि राणेंचा ‘लाथ मारीन, तिथे पाणी काढीन’ या पठडीतल्या स्वभावाचा सांधा काही केल्या जुळेना. त्यामुळे काँग्रेसचं राज्यातलं तसंच केंद्रातलं नेतृत्व आणि राणे यांच्यात कायमच एक अविश्वासाचं नातं राहिलं. राणेंच्या काँग्रेसमधल्या मुख्यमंत्रीपदाच्या संधीचं दार पहिल्यांदा किलकिलं झालं ते २००८ सालच्या मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर..

अतिरेकी हल्ल्यानंतर हॉटेल ताजच्या पाहणीदरम्यान अभिनेता पुत्र रितेश आणि सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मांना सोबत नेल्याचं निमित्त झालं आणि विलासरावांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पण तेव्हा अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावत पक्षनेतृत्वाने राणेंना निराश केलं. पुढे आदर्श सोसायटी प्रकरणात २०१० साली अशोक चव्हाणांनाही जावं लागलं. तेव्हाही राणेंनी मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला, पण मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर व्हायला वेळ लागतोय, हे पाहताच काहीशा अगतिक झालेल्या राणेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा देत थेट पक्षनेतृत्वावरच तोफ डागली. राणेंच्या या आगळीकीला दिल्लीश्वरांनीही आपल्या नेहमीच्या पठडीत उत्तर दिलं आणि मुख्यमंत्रीपदाची माळ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात पडली. पुढे यथावकाश राणेंचं बंड थंड झालं. त्यांनी आपला राजिनामा मागे घेतला. पण मंत्रीमंडळात परतल्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपदाच्या तुलनेत कमी महत्वाचं असलेलं उद्योग खातं दिलं गेलं. या सगळ्या राजकीय प्रवासात राणेंच्या पाठिशी कोकणी मतदार भक्कमपणे उभा राहिला. मात्र या पाठिंब्याला मतदारसंघातल्या विकासकामांचा आधार नव्हता, तर कोकणी माणसाची ती एक भावनिक गुंतवणूक होती. दरम्यानच्या काळात कोकणात राणेंच्या समर्थकांची दादागिरी सुरूच होती. संदेश पारकर, विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासारखे राणेंच्या ‘अरे ला कारे’ म्हणणारे नेतेही होते. पण तरीही नारायण राणेंबाबतची सहानुभूती टिकून असल्याने राणेंचं कोकणातलं राजकीय प्रस्थ कायम होतं. अखेर २०१४ च्या मोदी लाटेत राणेंचा कोकणातला बालेकिल्ला ढासळला. शिवसेनेच्या वैभव नाईकांकडून खुद्द नारायण राणेंना कुडाळ मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. शेजारच्या कणकवली मतदारसंघात राणेंचे चिरंजीव नितेश राणेंनी मात्र मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत राणे कुटुंबाचा झेंडा कोकणात फडकत ठेवला. मग पुन्हा वांद्रे पुर्वच्या पोटनिवडणूकीत राणेंना शिवसेनेच्या तृप्ती सावंतांकडून हार पत्करावी लागली. ही राणेंच्या राजकीय जीवनाचा अस्त असल्याचं म्हटलं गेलं. तरीही काँग्रेसने दिलेल्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून नारायण राणेंचा आवाज राज्याच्या राजकीय पटलावर बुलंदच राहिला. विधान परिषदेवरील आमदारकीच्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. राज्यातली वाढती गुन्हेगारी आणि गृह विभागाच्या अपयशावर बोट ठेवत त्यांनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं. पण राणेंना मुख्यमंत्र्यांकडूनही त्याच भाषेत उत्तर मिळालं. आणि ‘गुन्हेगारीबद्दल कुणी बोलावं, असा शालजोडीतला टोलाही मिळाला. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय... राणेंना पुन्हा एकदा सत्ता खुणावतेय, पण मुख्यमंत्रीपदासाठी नाही, तर आपल्या आणि आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी. राणेंनी भाजप प्रवेशासाठी वाजत गाजत काँग्रेस पक्ष सोडला. पण आपल्या कोट्यातून खासदारकी देऊनही कित्येक महिने उलटले तरी भाजपने त्यांना पक्षप्रवेश दिला नव्हता. कारण अर्थातच राणेंच्या भाजपप्रवेशापेक्षा भाजपला शिवसेनेसोबतची युती महत्वाची होती. मग राणेंनी मधल्या काळात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणूकीत राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात असलेल्या निलेश राणेंना राष्ट्रवादीने छुपी रसद पुरवल्याचीही जोरदार चर्चा होती. तरीही राणेपुत्राचा लोकसभेत दुसऱ्यांदा पराभव झाला आणि राणे पुन्हा भाजपकडे डोळे लावून बसले. आज भाजपने राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष  भाजपमध्ये विलीन करून घेतलाय, पण आपला प्राधान्यक्रम राखूनच. शिवसेनेसोबत विधानसभेत बिनबोभाट युती झाल्यावरच भाजपने राणेंची दखल घेतली. याउप्परही शिवसेनेविरोधात ‘ब्र’ ही न उच्चारण्याची अटही जाहीरपणे राणे पितापुत्रांना घातलीय. एकेकाळी दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी भेट दिली नाही म्हणून जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या राणेंसाठी भाजपची ही अट म्हणजे डोक्यावरून पाणी..अशी स्थिती..पण तरीही हा कटू डोस राणेंनी पचवलाय

कारण हे विलीनीकरण राणेंसाठी एक मोठा राजकीय दिलासा आहे. प्रतिकूल परिस्थितीत माघार घेऊन, पुन्हा नवी झेप घेण्यासाठी सज्ज होणं, हे कसलेल्या योद्ध्याचं लक्षण मानलं जातं हे खरंय, पण या विलीनीकरण सोहळ्यादरम्यान राणेंचे शब्दच बदललेल्या राजकीय हवेची आणि राणेंच्या माघारीची साक्ष देतायत. राणेंच्या देहबोलीत तो पुन्हा झेप घेण्याबाबतचा आत्मविश्वास दिसत नाही. भाजपमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करताना विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राणेंचं स्वागत केलंय. खरंतर २००५ साली शिवसेना सोडतानाही राणेंचं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी स्वागत केलं होतं. पण आता फरक आहे तो फक्त अटी शर्तींचा. कारण काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राणे स्वत:च्या अटीशर्तींवर काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले होते. पण आज भाजपमध्ये प्रवेश करताना राणेंच्या तोंडी “भाजपच्या ध्येयधोरणांच्या अधीन राहून काम करेन” हे शब्द आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राणेंना मुख्यमंत्रीपद खुणावत होतं. आज भाजपमध्ये पक्ष विलीन करताना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणं म्हणजे दिवास्वप्नच ठरावं..आज निश्चितच राणेंचे राजकीय प्राधान्यक्रम बदललेत. शिवाय राणेंची बदललेली भाषा आणि बदललेला नूरच सध्याच्या राजकीय हवेची साक्ष देतोय..फक्त बदलत्या राजकीय हवेचीच नव्हे, तर राणेंच्या राजकारणातल्या घटलेल्या दबदब्याचीह

 


संबंधित बातम्या

Saam TV Live