देशात 2हजारांच्यावर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू  

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 13 मे 2020

संसर्गग्रस्त आढळून येणार्‍या तपासण्यांचा दर 4.19 टक्के नोंदवण्यात आला आहे. 11 मे रोजी देशात सर्वाधिक 6.51 टक्के चाचण्यांचे अहवाल हे पॉझिटिव्ह  आले आहेत  देशातील 17 लाख 59 हजार नागरिकांची आतापर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिली. गेल्या एका दिवसात तब्बल 85 हजार 891 वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. . 

 राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले, तर 36 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूचा आकडा 868 झाला आहे. जवळपास 4 हजार 199 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.एकट्या महाराष्ट्रात रुग्णसंख्येने 23 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

संसर्गग्रस्त आढळून येणार्‍या तपासण्यांचा दर 4.19 टक्के नोंदवण्यात आला आहे. 11 मे रोजी देशात सर्वाधिक 6.51 टक्के चाचण्यांचे अहवाल हे पॉझिटिव्ह  आले आहेत  देशातील 17 लाख 59 हजार नागरिकांची आतापर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिली. गेल्या एका दिवसात तब्बल 85 हजार 891 वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. . 

देशात आतापर्यंत 2 हजार 293 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील मृत्यू दर 3.2 टक्के असून जगातील 7 ते 7.5 टक्के मृत्यू दरापेक्षा भारतातील मृत्यू दर कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.  देशात गेल्या चोवीस तासांमध्ये 87 कोरोनासंसर्गग्रस्तांचा मृत्यू झाला, तर 3 हजार 604 रुग्ण आढळले आहेत. देशातील संसर्गग्रस्तांचा आकडा त्यामुळे 70 हजार 756 झाला आहे. आतापर्यंत देशातील 22 हजार 454 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोना मुक्तीचे प्रमाण हे 31.73 टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे. 

WebTittle :: Over 2,000 corona victims die in the country

संबंधित बातम्या

Saam TV Live