४० हजार लोकांचे लसीकरण पूर्ण; पंढरपूर पॅटर्नचे सर्वत्र कौतुक

Over Forty Thousand  people vaccinated in Pandharpur
Over Forty Thousand  people vaccinated in Pandharpur

पंढरपूर : कोरोनाच्या Corona वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीची मागणी वाढली आणि तुटवड्यामुळे वेळेवर लसीकरण होत नसल्याने सर्वत्र रांगा लागल्याचे चित्र आहे. परंतु याला पंढरपूर Pnadharpur शहर व तालुका अपवाद ठरला आहे. येथील प्रशासनाने राबवलेल्या लसीकरण मोहिमेचे Vaccination Campaign सर्वत्र कौतुक केले जात आहे. Over Forty Thousand  peoples vaccinated in Pandharpur

काय आहे पंढरपूरचा पॅटर्न ?

लसीकरणासाठी नागरिकांनी नोंदणी केली आहे. ज्यांची नोंदणी झाली अशा नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करुन ती सर्व लोकांपर्यत पोचवली जाते. संबंधीत व्यक्तीला तसा मेजेस Message देखील पाठवला जातो. त्यामुळे ज्यांचे लसीकरण आहे, असेच लोक आता लसीकरण केंद्रावर येत असल्याचे चांगले चित्र दिसू लागले आहे. लसीकरण लाभार्थींच्या याद्या प्रसिध्द केल्यामुळे लसीकरण केंद्रावरील Vaccination Center अनावश्यक गर्दी कमी झाली आहे.

हे देखील पहा -

येथील प्रांताधिकारी सचिन ढोले Sachin Dhole आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर Aniket Manorkar यांनी या नव्या पध्दतीने लसीकरण सुरु केल्यामुळे वयोवृध्द नागरिकांचे विनासायास लसीकरण होण्यास मदत झाली आहे.

आता पर्यंत पंढरपूर तालुक्यातील 30 हजार तर शहरातील 10 हजार अशा एकूण सुमारे 40 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आज पंढरपूर शहरासाठी 300 डोस उपलब्ध झाले होते. शासन नियमानुसार पहिला डोस First dose घेतलेल्या नागरिकांचे आज लसीकरण पूर्ण करण्यात आले. पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये  लसीकरणाची सोय केली होती. ज्यांची यादीमध्ये नावे आहेत, असेच लोक आज येथे आले होते. त्यामुळे गर्दी विना शांततेत लसीकरणाची प्रक्रिया पार पडली आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com