बुलडाणा जिल्ह्यासाठी 25 हजार कोव्हिशील्ड लस !

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

जिल्ह्यातील 45 वर्षावरील 8 लाख 79 हजार नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे, त्यापैकी आज पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात 1 लाख 75 हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

बुलडाणा: बुलडाणा Buldhana जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी पासुन कोरोना Corona प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे, जिल्ह्यातील 45 वर्षावरील 8 लाख 79 हजार नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे, त्यापैकी आज पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात 1 लाख 75 हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. Over twenty five thousand covishield vaccines for Buldhana district

बुलडाणा जिल्ह्यातही 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण Corona Vaccinatiom मोहिमेस प्रारंभ झाला होता. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, दुर्धर आजार असणारे आणि ज्येष्ठ नागरिकांना या क्रमाने लसीकरण करण्यास चालू  आहे. आता नवीन नियमानुसार 45 वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात 102 केंद्रामधुन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रारंभी मोजक्याच चार केंद्रावर लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात आली.  आता पुन्हा तिसऱ्या टप्प्यात मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

आतापर्यंत जवळपास 1 लाख 75 हजार नागरिकांना कोरोनाची लसीकरण देण्यात आले आहे. सध्या बुलडाणा आरोग्य विभागाकडे 6 हजार लस उपलब्ध होत्या, आणि आज 25 हजार कोव्हिशील्ड Covishield लसी प्राप्त झाल्या आहेत. आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांनी लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन प्रशासना Administration कडून करण्यात येत आहे. Over twenty five thousand covishield vaccines for Buldhana district

जास्तीत जास्त संख्येने याचा फायदा घ्यावा जेणेकरून कोरोना या आजारापासून मुक्त राहू. जेणेकरून आपण आणि आपला जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होईल अशी प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे Rajendra Sangale  यांनी दिली आहे.

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live