GOOD NEWS! ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला सुरूवात, DGCIची सीरम इन्स्टिट्यूलाही परवानगी

साम टीव्ही
रविवार, 13 सप्टेंबर 2020
  • ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला सुरूवात
  • DGCIची सीरम इन्स्टिट्यूला परवानगी
  • वर्षाअखेरीस लस येण्याच्या आशा पल्लवित 

कोरोना संकटात दिलासा देणारी बातमी. भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला पुन्हा सुरूवात होणारंय. सीरम इन्स्टिट्यूटनं सर्वांच्या आशा पल्लवित केलीय. पाहूयात कुठवर आलीय कोरोना लसीच्या निर्मितीची तयारी.

जगात कोरोनाचा कहर असताना अनेक देश यावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 8 लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस तयार कऱण्यात आघाडीवर असेलल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु कऱण्यात आलय. त्यानंतर भारतातील भागीदार कंपनी असलेल्या सीरमलासुद्धा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं लशीची चाचणी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिलीय. आता लवकरच पुन्हा चाचणी सुरु करण्यात येईल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटनं दिली आहे. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड या लशीची चाचणी थांबवण्यात आल्यानंतर भारतातही मानवी चाचण्या थांबवण्याच्या सूचना डीजीसीआयनं दिल्या होत्या. जागतिक स्तरावरील स्थगित झालेल्या चाचण्या आणि औषध नियंत्रकांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. मात्र आता लसीच्या चाचणीला पुन्हा सुरूवात होणारंय.

ऑक्सफर्डच्या साथीनं ऍस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार असलेल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात चालू आहेत. ब्रिटनमधील स्वयंसेवकावर विपरीत परिणाम जाणवू लागल्यानं चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. फक्त इंग्लंडच नव्हे तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्येही चाचण्यांना स्थगिती देण्यात आली होती. 

ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेली ही लस जगात सर्वात अग्रेसर लस आहे. जगभरात ऍस्ट्राझेनेका कंपनीच्या माध्यमातून मानवी चाचण्या घेण्यात येत आहे.  देशातील मानवी चाचण्या सहउत्पादक कंपनी असलेली सिरम इन्स्टिट्यूट घेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुण्यासह देशभरातील 100 स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आलीय. हा दुसरा टप्पा सुरक्षितपणे पार पडलाय. आता अंतिम टप्प्यातील चाचण्यांची प्रतीक्षा होती. 

ऑक्सफर्डच्या लसीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. आता लसीच्या चाचणीला परवानगी मिळाल्यानं सर्वांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. वर्षाअखेरीस ही लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live