धुळ्यातील जागरूक नागरिकाने तयार केले ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर अँड स्टीमर मशीन

WhatsApp Image
WhatsApp Image

धुळे - सध्या कोरोनाचा Corona कहर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार लवकरात लवकर व्हावेत या प्रयत्नातून धुळे Dhule शहरातील अंकुश सोनवणे Ankush Sonawane यांनी ऑक्सीजन Oxygen कॉन्सेन्ट्रेटर अँड स्टीमर मशीन Steam Mashine तयार केले आहे. या मशिनद्वारे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मदत होणार असून धुळे महानगरपालिकेच्या Dhule Muncipal Corporation अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये हे मशीन लवकरच वापरात येणार असल्याची माहिती अंकुश सोनवणे यांनी दिली आहे. Oxygen Concentrator and Steam Machine made by a citizen of Dhule

सध्या संपूर्ण जगात कोरोना या महामारीने थैमान घातले असून केंद्र सरकार Central Government व राज्य शासनाकडून State Government विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोना लसीकरण ऑक्सीजन प्लांट उभारणे , व्हेंटिलेटर उपलब्ध करणे अश्या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत . कोरोनाच्या महामारी मुळे नागरिक दगावत आहेत.

हे देखील पहा -

त्यांना व्हेंटिलेटर वेळेवर मिळत नसल्याने कोरोना रुग्ण दगावत असल्यासंदर्भाची बाब लक्षात घेता धुळे शहरातील वलवाडी परिसरातील जागरूक नागरिक संशोधक म्हणून ओळख निर्माण करु पाहत आहे असे अंकुश सोनवणे यांनी आपल्या स्वतःच्या संकल्पनेतून या कोरोना आजारावर अभ्यास करीत ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर अँड स्टीमर मशीन तयार केले आहे.  हे मशीन बनवण्यासाठी त्यांना ४५ दिवस  लागले आहेत. Oxygen Concentrator and Steam Machine made by a citizen of Dhule

या मशीनचा फायदा रुग्णांना अतिशय उत्तम प्रकारे ठरत असून मशीन वापरल्याने छातीतील कप विरघळन्यास मदत होणार आहे तसेच ऑक्सीजन लेवल वाढविण्यासाठी देखील या मशीनचा चांगला उपयोग होणार आहे. अंकुश सोनवणे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड देखील तयार केले आहेत सदर मशीन वापर केल्याने कोरोना या आजारावर लवकर मात करता येणार आहे.

या मशीनची माहिती धुळे शहराचे महापौर,आयुक्त यांना देखील देण्यात आली असून याबाबत अधिक माहिती आज जाणून घेण्यासाठी मनपा सभागृह नेते राजेश पवार छावा संघटनेचे नाना कदम यांनी अंकुश सोनवणे यांच्या घरी येऊन मशीनची पाहणी केली . या मशीनचा उपयोग नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असून लवकरच मनपाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी मशीन उपलब्ध होणार असल्याचे समजते आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com