कोरोनाच्या लढ्यासाठी धावली ऑक्सिजन एक्स्पेस.....

Oxygen Express
Oxygen Express

मुंबई : राज्यात कोरोना Corona रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरी लाट आल्याने नव्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढत आहे. रोज हजारोंची रुग्ण वाढ असल्यामुळे आरोग्य Health व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण पडत आहे. वेगवेगळी औषधं, रेमडेसिव्हीर Remdesivir इंजेक्शन याबरोबरच ऑक्सिजनचा Oxygen प्रचंड तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणात भासत आहे. या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने देशातील वेगवेगळ्या विभागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात येत आहे. Oxygen Express to run in Maharashtra to fight against Corona.

त्याकरिता विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार आहे. यामधून राज्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार आहे. मंगळवारी रात्री ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजन आणण्यसाठी जमशेदपूर करिता रवाना झाली आहे. मध्य प्रदेश Madhya Pradesh आणि महाराष्ट्र Maharashtra सरकारने लिक्वीड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. यामध्ये दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती. रेल्वे मंत्रालयाकडून लगेचच होकार आले.

त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वेमार्गाने विजाग, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो करिता ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. मंगळवारी रात्री ही एक्स्प्रेस शेगाव Shegaon रेल्वे स्थानकावरूनही पास झाली. त्यानंतर राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा पाहता ऑक्सिजन एक्स्प्रेस बघितल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com