Breaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली

गोपाल मोटघरे
बुधवार, 9 जून 2021

हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्या नंतर तात्काळ तांत्रिक विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे बंब ही घटनास्थळी दाखल झाले आणि आणि आता वॉलची दुरुस्ती केल्या नंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनि दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे चालविल्या जाणार-या YCM रुग्णालयात हा प्रकार आत्ता काही वेळा पूर्वी घडलाय , YCM हे  800 बेडची क्षमता असलेलं रुग्णालय असुन सध्या इथे 406 कोरोनाबधित रुग्ण उपचार घेत आहेत. टँकर मधून आणलेला ऑक्सिजन एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये भरताना प्रेशर जास्त झाल्याने सेफ्टी वॉल लिकेज झाला आणि  मोठ्या प्रमाणत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. 

हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्या नंतर तात्काळ तांत्रिक विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे बंब ही घटनास्थळी दाखल झाले आणि आणि आता वॉलची दुरुस्ती केल्या नंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनि दिली आहे.

हे देखील पाहा

हा सगळा प्रकार नाशिक मध्ये घडलेल्या गॅस गळती घटनेची पुनरावृत्ती करणारिच होती, मात्र आता इथे परिस्थिती नियंत्रणात असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याच बोललं जातंय. अस जरी असले तरी टाकीमध्ये प्रमाणाच्या बाहेर गॅस भरला गेल्यानेच हा प्रकार घडल्याची माहिती समोर येतीय. त्यामुळे ठेकेदारानी नेमलेल्या कर्मचा-यापैकी कुणीच गॅस भरताना हजर नव्हतं का आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर या घटनेचा काही परिणाम झालाय का  या बाबत अधिकृत माहिती दिली जात नसल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

Edited By : Pravin Dhamale

संबंधित बातम्या

Saam TV Live