मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण

oxygen plant
oxygen plant

धुळे - संपूर्ण देशासह राज्यामध्ये Maharashtra देखील कोरोनाने कहर केला आहे आणि या कोरोनाच्या Corona वाढत्या रुग्णांवर उपचार करीत असताना ऑक्सिजनचा Oxygen मोठा तुटवडा भासू लागला आहे आणि हाच तुटवडा भरून काढण्यासाठी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल Amrishbhai Patel यांनी एक पाऊल पुढे येत हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या प्लांटचे  मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. Oxygen Generation Project at Mukeshbhai Patel Jumbo Covid Center

शिरपूर Shirpur वरवाडे नगरपरिषद संचलित मुकेशभाई पटेल Mukeshbhai Patel टाऊन हॉल मध्ये सुरु करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पटेल परिवाराचे दातृत्व व योगदानातून सुमारे ४० लाख रुपये आर्थिक देणगीतून ऑक्सिजन निर्मितीचा हा मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे ३० ते ३२ मोठे सिलेंडर Cylinder एवढ्या क्षमतेने दररोज ऑक्सिजन निर्मिती होऊन रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पात बाहेरून हवा कॉम्प्रेसर मध्ये ओढली जाऊन ती हवा एअर रिसिव्हर द्वारे एका टँक मध्ये गोळा केली जाईल. त्यानंतर एअर ड्रायरमध्ये हवा शुद्ध होऊन त्यातील ड्राय युमिलिटी काढून शुद्ध हवा तयार होईल. हवेतील विषाणू बाहेर काढून स्टोरेज ऑक्सिजन टॅंक मधून सेंट्रल लाईन पाईपद्वारे रुग्णांपर्यंत शुद्ध ऑक्सिजन पुरविला जाणार असल्याचे उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले आहे. Oxygen Generation Project at Mukeshbhai Patel Jumbo Covid Center

Edited By - Shivani Tichkule
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com