मुंबईचा ऑक्सिजन मॅन

सुमित सावंत
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

संपूर्ण महाराष्ट्रात एकीकडे रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावत आहेत, तर दुसरीकडे मुंबईच्या मलाडमध्ये राहणारे शहनवाज शेख लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत

मुंबई : राज्यातील कोरोना Corona रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात Maharashtra एकीकडे ऑक्सिजनच्या Oxygen कमतरतेमुळे कोरोनाबाधित रुग्ण आपला जीव गमावत आहेत, तर दुसरीकडे मुंबईच्या Mumbai मलाडमध्ये Malad राहणारे शहनवाज शेख Shahnawaz Sheikh लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत. 'ऑक्सिजन मॅन' म्हणून प्रसिद्ध झालेले शेख एका फोन कॉलवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहेत. Oxygen Man Mumbai

लोकांना अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी एक 'वॉर रुम' ही तयार केले आहे. खरं तर गेल्या वर्षी संक्रमण कालावधीच्या सुरुवातीला त्यांच्या एका मित्राच्या Friend पत्नीने ऑक्सिजन अभावी ऑटो रिक्षात प्राण सोडले होते. त्यानंतर त्यांनी आता मुंबईतील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाईन Helpline नंबर जारी केला आहे. 

शहनावाज यांनी वॉर रुमही बनवले आहे. पण ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम सुरू केलं असता, शहनावाज यांच्या जवळचे पैसे संपले होते. यानंतर त्यांनी स्वतःची कार विकण्याचा निर्णय घेतला आणि आपली २२ लाखांची SUV गाडी विकली. विक्रीनंतर मिळालेल्या पैशांनी शाहनवाजने १६० ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करुन गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत. Oxygen Man Mumbai 

गेल्यावर्षीपासून आतापर्यंत ४ हजार पेक्षा जास्त लोकांपर्यंत त्यांनी मदत पोहोचवली आहे. सध्या त्यांच्याजवळ २०० ऑक्सिजनचे ड्यूरा सिलेंडर Cylinder आहेत. यामध्ये ४० भाड्याचे आहेत. फोन करणाऱ्या गरजूला ते पहिले आपल्याकडे बोलावून ऑक्सिजन घेऊन जाण्यास सांगतात, आणि जे सक्षम नसतात त्यांच्या घरी ते सिलेंडर स्वतः पोहचवत आहेत. त्यामुळे हा ऑक्सिजन मॅन गरजूंसाठी देवदूत बनून आलाय, असं म्हणायला हरकत नाही.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live